युरियाचे अनुदान बँक खात्यात

By Admin | Updated: April 3, 2015 00:27 IST2015-04-03T00:27:08+5:302015-04-03T00:27:08+5:30

गॅस सिलिंडरप्रमाणे युरियाचे अनुदानही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. खुल्या बाजारातील

Urea subsidy in the bank account | युरियाचे अनुदान बँक खात्यात

युरियाचे अनुदान बँक खात्यात

शासनाचा उपक्रम : काळाबाजार रोखण्यावर शासनाचा प्रयत्न
भंडारा :
गॅस सिलिंडरप्रमाणे युरियाचे अनुदानही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. खुल्या बाजारातील युरिया त्या-त्या वेळी असणाऱ्या मूळ किंमतीला खरेदी करावा लागेल. त्यानंतर काही दिवसातच त्यावर असणाऱ्या अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा केले जाणार आहे.
शेतकऱ्यांकडून वापरला जाणारा अनावश्यक युरिया आणि त्याच्या वितरकांकडून होणारा काळा-बाजार थांबविण्यासाठी युरिया खताचे अनुदान बँक खात्यावर दिले जाणार आहे. युरियाच्या ५० किलो पोतीसाठी सध्या २८४ रुपये मोजावे लागत आहे. याची किंमत ही कच्च्या मालाच्या दरावर कमी-जास्त होत असते. त्यानुसार शासनाकडून अनुदान दिले जाते. २८४ रूपयांपेक्षा जास्त होणारी रक्कम शासनाकडून थेट कंपनीला दिली जाते. कंपनीकडून युरियाची विक्री झालेला अहवाल व पावती दाखविल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट कंपनीला मिळते. वितरकांकडून अनुदानाचे खत, मिश्रखत इतर कारखान्यासाठी जादा दराने विकले जात असल्याच्या अनेक अनेक तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे शासनाने युरियाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत कंपन्यानी वितरकांना दिलेल्या सर्वच युरियाला अनुदान दिले जात होते. यातूनच काळाबाजार होत होता. शेतकऱ्यांना न देता मिश्रखत किंवा इतर कारणासाठी युरिया वापरला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांऐवजी अशाच कंपन्यांना अनुदानाचा लाभ होत होता. (नगर प्रतिनिधी)

शासनाकडे ही योजना प्रस्तावित आहे. याअंतर्गत युरियाचे अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे. योजनेचा व्याप मोठा आहे. अद्याप यासंदर्भात कुठल्याही मार्गदर्शक सूचना शासनाकडून आलेल्या नाहीत.
- रविशंकर चलवदे,
जिल्हा कृषी अधिकारी भंडारा.

Web Title: Urea subsidy in the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.