विरली कालव्याच्या पाळीवर बेवारस रेतीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:23 IST2021-06-10T04:23:49+5:302021-06-10T04:23:49+5:30

येथून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या इटान, नांदेड गावाशेजारून वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे परिसरातील ट्रॅक्टर मालकासह गाठसाठ बांधून अवैधरीत्या रेतीउपसा ...

Unused sand deposits on rare canal banks | विरली कालव्याच्या पाळीवर बेवारस रेतीसाठा

विरली कालव्याच्या पाळीवर बेवारस रेतीसाठा

येथून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या इटान, नांदेड गावाशेजारून वैनगंगा नदी वाहते. त्यामुळे परिसरातील ट्रॅक्टर मालकासह गाठसाठ बांधून अवैधरीत्या रेतीउपसा करणाऱ्या चोरट्यांसाठी हे नदीपात्र वरदान ठरले आहे. गत कित्येक दिवसांपासून ईटान येथील नदीपात्रातील रेतीची अवैध चोरटी वाहतूक सुरू असून रात्रंदिवस ट्रॅक्टरच्या साहाय्याने बेवारस रेतीसाठा जमा केला जातो. असाच एक रेतीसाठा विरली (बु.) ते ईटान मार्गावरील विरली (बु.) हद्दीत असलेल्या कालव्याच्या उजव्या बाजूला सहज नजरेस येणार नाही अशा ठिकाणी जमा केलेला आहे. ही रेतीची ढिगारे कुणाचे आहेत? या विषयी गूढ कायम असले तरी या माध्यमातून लाखो रुपयांचा शासकीय महसूल मात्र बुडत आहे. ही साठवून ठेवलेली रेती ऑर्डर घेऊन सोयीनुसार त्या ठिकाणी पोहोचविली जाते. असा हा नित्याचा क्रम असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करीत असल्याचा जनतेचा आरोप आहे. या रेतीमाफियांचे महसूल विभागातील लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्व अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याची जनतेत चर्चा आहे.

Web Title: Unused sand deposits on rare canal banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.