अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:35 IST2021-03-20T04:35:22+5:302021-03-20T04:35:22+5:30
भंडारा शहरात पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटात जाेरदार पाऊस झाला. तालुक्यात गत २४ तासात ३.३ मिमी पावसाची ...

अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला
भंडारा शहरात पहाटे ४ वाजताच्या सुमारास विजांच्या प्रचंड कडकडाटात जाेरदार पाऊस झाला. तालुक्यात गत २४ तासात ३.३ मिमी पावसाची नाेंद झाली. तुमसर तालुक्यात ९.४ मिमी, माेहाडी २.२ मिमी, लाखांदूर तालुक्यात १.३ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. साकाेली तालुक्यातील सासरा येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील सागाच्या झाडावर सकाळी ९.३० वाजता वीज काेसळली. शाळा सुरु असल्याने विद्यार्थी व शिक्षक प्रचंड घाबरले. परंतु काेणतीही अनुचित घटना घडली नाही. विरली बुज. परिसरालाही पावसाचा तडाखा बसला. पालांदूर परिसरात मध्यरात्री जाेरदार पाऊस बरसला. शेतात असलेले पीक सावरण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली. हरभरा, वाटाणा, गहू या रबी पिकांचा काढणीचा हंगाम सुरु असून काढणी झालेले धान्य झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली.