साकोलीत बेमुदत साखळी उपोषण सुरु
By Admin | Updated: December 10, 2014 22:51 IST2014-12-10T22:51:49+5:302014-12-10T22:51:49+5:30
तहसील कार्यालयाचे बांधकाम थांबविण्यात यावे, जुन्याच ठिकाणी बांधकाम करण्यात यावे यासाठी काल साकोली बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र मारहाणीमुळे आंदोलनाला वेगळेच रुप

साकोलीत बेमुदत साखळी उपोषण सुरु
साकोली : तहसील कार्यालयाचे बांधकाम थांबविण्यात यावे, जुन्याच ठिकाणी बांधकाम करण्यात यावे यासाठी काल साकोली बंद व धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र मारहाणीमुळे आंदोलनाला वेगळेच रुप घेतले असून आता साखळी उपोषण सुरु करण्यात आले. उपोषण मंडपाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी भेट दिली.
काल पाच वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले होते. मात्र आरपीआयचे कैलाश गेडाम यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यामुळे या आंदोलनाला वेगळे वळण आले. अविनाश ब्राम्हणकर, हेमंत भारद्वाज, शिवकुमार गणवीर, कैलाश गेडाम, अचल मेश्राम, अॅड.दिलीप कातोरे, मार्तंड भेंडारकर हे पोलीस ठाण्यात गेले. पोलीस निरीक्षकांनी माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र त्यांनी नकार दिला. परिणामी उपोषण सुरु झाले.(तालुका प्रतिनिधी)