पालिकेच्या क्रीडा संकुलातील वृक्षांची विनापरवानगीने कटाई
By Admin | Updated: December 10, 2014 22:52 IST2014-12-10T22:52:34+5:302014-12-10T22:52:34+5:30
स्थानिक लायब्ररी चौक परिसरातील नगर पालिकेच्या क्रीडा संकुलातील दोन मोठे झाड बुधवारला सकाळी अवैधरित्या तोडण्यात आले. या प्रकरणाची तक्रार शहरातील प्रख्यात शल्यचिकीत्सक डॉ.देवेंद्र तुरस्कर

पालिकेच्या क्रीडा संकुलातील वृक्षांची विनापरवानगीने कटाई
भंडारा : स्थानिक लायब्ररी चौक परिसरातील नगर पालिकेच्या क्रीडा संकुलातील दोन मोठे झाड बुधवारला सकाळी अवैधरित्या तोडण्यात आले. या प्रकरणाची तक्रार शहरातील प्रख्यात शल्यचिकीत्सक डॉ.देवेंद्र तुरस्कर यांनी सकाळी पोलिसांना दिली. परंतु नगर पालिकेच्या असहकार्यामुळे सायंकाळ उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
डॉ.तुरस्कर म्हणाले, सकाळी मी जेव्हा रुग्णालयात होतो, त्यावेळी परिसरातील काही नागरिक येऊन क्रीडा संकुलातील दोन वृक्ष तोडत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मुलगा डॉ.नितीन तुरस्कर सोबत क्रीडा संकुलात पोहोचले. मजुरांना विचारले असता त्यांनी दोन नगरसेवकांचे नाव सांगून त्यांनीच हे वृक्ष तोडण्याचे काम दिले असल्याचे सांगितले. वृक्ष तोडीमुळे अस्वस्थ झालेले डॉ.तुरस्कारांनी थेट पोलीस ठाणे गोठले. त्यांनी अवैधरित्या वृक्ष तोड प्रतिबंध कायद्याचा हवाला सांगत त्यांनी वृक्षकटाई करणाऱ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
त्यानंतर पोलिसांनी मोका पंचनामा केला. महाराष्ट्र नागरी क्षेत्र वृक्ष संरक्षण आणि जतन १९७५ कायद्याची माहिती घेतली. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार मागविण्यात आली. परंतु पालिकेच्या तक्रारीत वृक्ष कटाई करणाऱ्यांनी नावे अज्ञात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्यक्षदर्शिने दिलेल्या माहितीनसुार या मजुरांनी दोन नगरसेवकांचे नाव घेतले होते. त्यानंतर पालिकेला नवीन तक्रार मागविण्यात आली. सायंकाळ होऊनही पालिकेने तक्रार दिली नव्हती. त्यामुळे पोलिसांना गुन्हा दाखल करता आला नव्हता. (जिल्हा प्रतिनिधी)