युनिव्हर्सल पुनरूज्जीवीत होणार!
By Admin | Updated: December 7, 2015 04:59 IST2015-12-07T04:59:16+5:302015-12-07T04:59:16+5:30
तुमसर जवळील मॅग्नीज शुध्द करणारा कारखाना मागील १२ वर्षांपासून बंद आहे. सुमारे तीन हजार कामगारांना या

युनिव्हर्सल पुनरूज्जीवीत होणार!
मोहन भोयर ल्ल तुमसर
तुमसर जवळील मॅग्नीज शुध्द करणारा कारखाना मागील १२ वर्षांपासून बंद आहे. सुमारे तीन हजार कामगारांना या कारखान्याने बेरोजगार केले. हा कारखाना सुरु करण्यासाठी शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.
तालुक्यात मॅग्नीजच्या दोन व मध्यप्रदेशातील तिरोडी येथे एक खाण आहे. या खाणीतील मॅग्नीज देश-विदेशात जाते. त्या अनुषंगाने तुमसर जवळील मानेकनगर येथे सुमारे ४० वर्षापूर्वी युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु करण्यात आला होता. एका युनिटचे येथे दुसरा युनिट तयार करण्यात आला. सुमारे २५ वर्ष हा कारखाना नियमित सुरु होता. सन १९९३ ला हा कारखाना वीज बील न भरल्याने वीज मंडळाने या कारखान्याचा वीज पुरवठा खंडीत केला. पुढे १९९९ ला हा कारखाना सुरु करण्यात आला. पुन्हा सन २००३ मध्ये हा कारखाना आजपर्यंत बंद आहे.
या कारखान्यावर वीज बिलापोटी सुमारे २५० कोटी थकीत होते. शासनाच्या वाटाघाटीत या कारखान्याचे काही थकीत वीज बील माफ करण्यात आले. उर्वरीत वीज बिल कंपनी मालकाने येथे भरली. सुमारे १२०० कामगारांपैकी २५० कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.
उर्वरित कामगारांनी येथे स्वेच्छानिवृत्ती घेतली. स्वेच्छानिवृत्तीचे प्रकरणही येथे गाजले. तालुक्यात नविन कारखाने सुरु झाले नाही. बंद पडलेला कारखाना सुरु कसा होईल असा प्रयत्न येथे सुरू असल्याचे समजते, आमदार चरण वाघमारे यांनी यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री तथा मुख्यमंत्र्याशी भेटून चर्चा केली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते. उद्योगमंत्र्यांशी प्राथमिक चर्चा करुन जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीत मालकांशी बैठक आयोजित करण्यास सुचविले आहे. उद्योग सचिवांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तसे निर्देश दिले. यातून काय मार्ग निघतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.
कारखाना सुरु होणार भाडे तत्वावर
४युनीव्हर्सल फेरो मॅग्नीज शुध्दीकरण कारखाना कोणत्याही स्थितीत सुरु झालाच पाहिजे अशी भूमिका येथे घेण्याची शक्यता आहे. स्वत: कंपनी मालक हा कारखाना सुरु करण्यास इच्छुक नसल्याचे समजते. त्यामूळे सदर कारखाना भाडे तत्वावर सुरु करण्याच्या येथे हालचाली सुरु असल्याचे समजते. तुमसर तालुक्यातीलच एक उद्योगपती तो भाडे तत्वावर घेण्याच्या तयारीत आहे.शेकडो एकर जमीन या कारखान्याकडे पडून आहे. कारखाना भंगारावस्थेत पोहोचला आहे. मागील काही दिवसापासून लोह खनिजाला देशात व आंतरराष्ट्रीय बाजारात भाव नाही. त्यामूळे उद्योगपती हा कारखाना खरेदी करण्यास इच्छूक नाही असे समजते.
तुमसरजवळच्या युनिव्हर्सल फेरो कारखाना सुरु व्हावा याकरिता राज्याचे उद्योगमंत्री तथा मुख्यमंत्र्याशी चर्चा केली. उद्योगमंत्र्यांनी संबंधित सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत कारखाना मालकासोबत बैठकीचे आयोजन करण्यास सांगितले आहे. सकारत्मक तोडगा काढून कारखाना पुन्हा सुरु व्हावा याकरिता प्रयत्नशील आहे.
- चरण वाघमारे,
आमदार तुमसर