युनिव्हर्सल कारखाना टाकणार कात?

By Admin | Updated: November 30, 2014 22:58 IST2014-11-30T22:58:48+5:302014-11-30T22:58:48+5:30

केंद्र शासनाने तात्काळ निर्णय व धोरण या तत्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याने आजारी कारखान्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरोला अकरा

Universal factory? | युनिव्हर्सल कारखाना टाकणार कात?

युनिव्हर्सल कारखाना टाकणार कात?

उद्योगपती इच्छूक : कारखाना विक्रीच्या हालचाली सुरु
तुमसर : केंद्र शासनाने तात्काळ निर्णय व धोरण या तत्वाचा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याने आजारी कारखान्यांना नवसंजिवनी मिळाली आहे. तुमसरजवळील मॅग्नीज शुद्ध करणारा युनिव्हर्सल फेरोला अकरा वर्षाने पुन्हा अच्छे दिन येत असल्याची माहीती आहे. महावितरण, बीआयएफआय महसूलची ग्रहणे सुटली असून देशातील नामवंत उद्योगपतींनी हा कारखाना खरेदी करण्याच्या हालचाली सुरु केल्याची माहीती आहे.
वैनगंगा नदी काठावर माडगी (तुमसर) येथे मॅग्नीज शुद्ध करणारा कारखाना युनिव्हर्सल फेरो अलाईड अ‍ॅन्ड केमीकल्स लिमिटेड हा कारखाना मागील ४० वर्षापूर्वी सुरु झाला होता. कारखाना व्यवस्थापन व महा वितरण कंपनीत थकीत वीज बीलाचे प्रकरण दिल्ली येथील बीआयएफ मंडळापुढे प्रलंबित होता. या कारखान्याकडे महावितरणाचे २५० कोटी वीज बीलाचे थकीत होते. थकीत वीज बीलाचा गुंता येथे नुकताच संपल्याची माहीती आहे. अभय योजनेअंतर्गत हा गुंता संपला. महसूल विभागाचे प्रकरणही संपले. कामगारांचा गुंता अंतीम टप्प्यात आहे.
कारखान्याची विक्री
कंपनी मालकांनी हा कारखाना विक्री काढल्याची विश्वसनीय माहीती आहे. मागील चार महिन्यात देशातील नामवंत उद्योगपतींचे शिष्टमंडळ येथे येऊन गेले. यात जिंदल स्टील अ‍ॅन्ड पॉवर, सनफ्लॅग आयर्न अ‍ॅन्ड स्टील, रायपूर येथील सारडा स्टील, हिरा स्टील, आधूनिक मेटल वंदना स्टील येथील वरिष्ठ अधिकारी या कारखान्याला भेटी देऊन गेले. ३०० एकर परिसरात वैनगंगा नदी काठावर हा कारखाना असून सर्व मूलभूत सोयीसुविधा येथे उपलब्ध आहेत. कामगार तथा अधिकाऱ्यांच्या सदनिका, शाळा, रुग्णालय, रेल्वे ट्रॅकची सुविधा आहे. हा कारखाना खरेदी इच्छूक उद्योगपतींकडे स्वत:चे पॉवर प्लांट आहेत.
सध्या मॅग्नीज शुद्ध करणाऱ्या कारखान्याकडे पॉवर प्लांट असणे आवश्यक आहे. वीजपूरवठा २४ तास असणे व महागडी वीज खरेदी करणे विद्यमान कारखाना मालकाला परवडणारे नाही. त्यामुळेच कारखाना विक्रीचा निर्णय येथे घेण्यात आला अशी माहीती आहे. या कारखान्यात १२०० कामगार कार्यरत होते. येथील मॅग्नीजला देश विदेशात मोठी मागणी होती. आजारी व भंगारात निघालेल्या कारखान्याकडे ३०० एकर जमिनी पडून होती. संसदीय समितीची अशा कारखान्यावर करडी नजर होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Universal factory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.