एकोडीत पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:39 IST2021-09-05T04:39:26+5:302021-09-05T04:39:26+5:30
सध्या पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात सण साजरे होत आहेत. अशातच विद्युत विभाग वीज खंडित करीत असल्याने नागरिकांना अंधारात ...

एकोडीत पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित
सध्या पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात सण साजरे होत आहेत. अशातच विद्युत विभाग वीज खंडित करीत असल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. गावातील बहुतेक शेतकरी व नागरिकांना कमालीचा त्रास होत आहे. येथील ग्रामपंचायतीवर जवळपास तीन लाखांचे विद्युत देयक बाकी असल्याचे कळले आहे. पूर्वी ग्रामपंचायतच्या पथदिव्यांचे वीज बिल शासनस्तरावर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरले जात होते. त्यामुळे वीज बिलाची ग्रामपंचायतींना चिंता नव्हती; परंतु आता शासनाने हात वर केले असून ग्रामपंचायतने पथदिव्यांचे वीज बिल भरावयाचे आहे. पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामीण भागात सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने शासनासोबत चर्चा करून लवकरात लवकर वीज देयकाचा तोडगा काढून गावातील पथदिवे सुरू करावेत, अशी एकमुखी मागणी येथील जनतेने केली आहे.