बिनाखीत रोहयोची मजुरी अडली
By Admin | Updated: December 16, 2014 22:47 IST2014-12-16T22:47:49+5:302014-12-16T22:47:49+5:30
बिनाखी येथे रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या पांदन रस्त्याचे माती कामाची मजुरी अद्याप मजुरांना मिळाली नाही. या शिवाय शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले नसल्याने रोष पसरला आहे.

बिनाखीत रोहयोची मजुरी अडली
चुल्हाड (सिहोरा) : बिनाखी येथे रोहयो अंतर्गत करण्यात आलेल्या पांदन रस्त्याचे माती कामाची मजुरी अद्याप मजुरांना मिळाली नाही. या शिवाय शौचालयाचे अनुदान प्राप्त झाले नसल्याने रोष पसरला आहे.
बिनाखी ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे रोहयो अंतर्गत माती काम एप्रिल २०१४ मध्ये करण्यात आले आहे. या माती कामावर १५० मंजूर कार्यरत होते. मजुरांपैकी ११८ मजुरांना अद्याप मजुरी मिळाली नाही. ८ महिन्याचा कालावधी पूर्ण होत असताना रोहयो विभाग तांत्रिक अडचण असल्याचे कारण सांगत आहेत. मजुरी प्राप्त करण्यासाठी मजूर तालुका कार्यालयात हेलपाट्या मारत आहेत. परंतु अद्याप मजुरी वाटपाचा मार्ग काढण्यात आलेला नाही. दरम्यान गावात मजुरी वाटपात विलंब होत असल्याने ग्राम पंचायत पदाधिकारी तथा रोजगार सेवकाला धारेवर घेतले जात आहेत. या कारणावरून गावात तू तू मै मै वाढली आहे. मजुराची समस्या निकाली काढण्यासाठी पदाधिकारी आणि रोजगार सेवक यांची रोज रोहयो विभागात धाव घेत आहेत. परंतु तोडगा निघत नाही. यंत्रणेच्या निष्क्रीयतेमुळे मजुरांना न्याय मिळत नाही असा आरोप मजूर करीत आहेत. गावात निर्मल भारत योजनेअंतर्गत शौचालय बांधकाम करण्यात आली आहेत. या शौचालयाचे अनुदान रोहयोच्या निर्धात करण्यात आले आहे. परंतु रोहयो अंतर्गत निधी उपलब्ध करण्यात आले नाही. अल्प अनुदान राशीत शौचालय बांधकाम होत नाही. हे बांधकाम पूर्ण करताना अधिक राशीची गुंतवणूक लाभार्थी करीत आहेत. काही लाभार्थी उसणवारीवर साहित्य आणि पैशाची जुळवाजुळव करीत आहे. गावात अशा २५ लाभार्थ्यांना शौचालयाचा अनुदान प्राप्त झालेला नाही. अन्य गावात हीच स्थिती आहे. यावरुन लाभार्थ्यांना दाग दागिने गहाण ठेवून उसणवारीचे पैसे द्यावे काय? असा सवाल लाभार्थी करीत आहेत. लाभार्थी आणि मजुरांना तात्काळ अनुदान राशी वाटप करण्याची मागणी सरपंच लिलाधर किरणापुरे, उपसरपंच देवेंद्र मेश्राम तथा तंमुसचे अध्यक्ष राजेंद्र बघेले व गावकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)