अंशकालीन कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड
By Admin | Updated: February 28, 2016 00:56 IST2016-02-28T00:56:31+5:302016-02-28T00:56:31+5:30
शासनाने तब्बल १५ वर्षापासून अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका...

अंशकालीन कर्मचाऱ्यावर बेकारीची कुऱ्हाड
शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका : शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी
लाखांदूर : शासनाने तब्बल १५ वर्षापासून अंशकालीन कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका अंशकालीन कर्मचाऱ्यावर बसत असल्याचे चित्र दिसत आहे.
यात अनेक अंशकालीन कर्मचारी केवळ तुटपुंज्या मानधनावर राबल्याने आयुष्यातील अनेक चांगली वर्षे मोठ्या आशा अपेक्षेने सेवेत घालविल्याने अनेक लाभार्थ्यांनी सेवा करण्यात वय घालविली. आज १५ वर्षानंतर बऱ्याच कर्मचाऱ्यांना वयाच्या अटीमुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे फटका बसत आहे.
या प्रकारामुळे व शासनाच्या उदासीन धोरणामुळे आज अनेकांचे कुटंूब उघड्यावर पडले असून अनेकांचे स्वप्न भंग झाले आहे. त्यांच्यावर जीवन जगण्याचे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पदवीधर अंशकालीन कर्मचारी आजही चातका प्रमाणे नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र शासनाकडून त्यांच्यावर ऐनकेन प्रमाणे अन्याय होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याने समाजाच्या सुद्धा यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनसुद्धा अत्यंत गरीब व केविलवाणा आहे. आयुष्यातील बराच मोलाचा काळ अल्प मानधनावर शासकीय सेवेत घालविणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)