अशिक्षित शेतकऱ्याने फुलविली मिरचीची तंत्रशुद्ध बाग
By Admin | Updated: December 9, 2014 22:45 IST2014-12-09T22:45:47+5:302014-12-09T22:45:47+5:30
शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भाव मिळत नाही. शेतीत पिक घेणे तोट्यातच असते. अशी बहुतेक शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देण्याची हिंमत सिरसोली (कान्हळगाव) येथील

अशिक्षित शेतकऱ्याने फुलविली मिरचीची तंत्रशुद्ध बाग
राजू बांते - मोहाडी
शेती परवडत नाही. उत्पादनानुसार भाव मिळत नाही. शेतीत पिक घेणे तोट्यातच असते. अशी बहुतेक शेतकऱ्यांची ओरड असते. परंतु, पारंपरिक पिकांना फाटा देण्याची हिंमत सिरसोली (कान्हळगाव) येथील अशिक्षित शेतकरी गणेश मोहारे यांनी मोठ्या जिद्दीने तंत्रशुद्ध पद्धतीने मिरचीची शेती फुलविली आहे.
भंडारा जिल्ह्यातील शेतकरी भाताची पारंपारीक शेती करतात. त्यानंतर काही शेतकरी गहू पीक घेतात. भात पिकांचा हंगाम येईपर्यंत जमीन कोरडीच राहते. जांब क्षेत्रात बागायती शेती बऱ्याच दिवसापासून केली जाते. आज स्थिती वेगळी आहे. मोहाडी तालुक्यात सिरसोली, खुटसावरी, खमारी, बेटाळा या परिसरात बरेच शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहे. तरीही बागायती शेती पारंपरिक पद्धतीने शेतकरी करीत आहेत. अशाच एका अशिक्षित शेतकऱ्याने मिरचीची बाग फुलविली आहे. खर्च वजा जाता २५ ते ३५ लाखापर्यंत रुपये घरी नेता येतील इथपर्यंत त्यांनी प्रगती साधली आहे.
सिरसोली कान्हळगाव येथील शेतकरी गणेश मोहारे यांनी आधुनिक पद्धतीने मिरचीची शेती विकसीत करून तो शेतकरी तालुक्यात रोल मॉडेल बनला आहे. या शेतकऱ्याला एवढ्या उंचीवर नेण्याच्या श्रेयात तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, कृषी सहाय्यक गणेश शेंडे यांचा मोठा वाटा आहे. गणेश मोहारे यांनी बागायती शेतीत बरेच उतारचढाव बघितले आहेत. मागीलवर्षी त्यांचे मिरचीचे ५० टक्के पिक किडीने वाया गेले. तरीही न खचता कीड कशी लागली याची कारणे शोधली. पुढील पिक खराब होवू नये, यासाठी तालुका कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक यांना शेतीवर आणले.
यावर्षी मोहारे यांनी प्रयोग म्हणून पारंपारिक व तंत्रशुद्ध पद्धतीने मिरचीची लागवड केली. आत्मा अंतर्गत सिरसोली येथे मिरची लागवडीचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणाचा लाभ घेत मोहारे यांनी ९ एकर शेतीत ठिंबक संच बसविले आहेत. त्यात सात एकर क्षेत्रात मिरचीचे पीक प्रत्येकी एक एकरात भेंडी व कारली, चवळीचे पीक लावले आहे. वरंभा पद्धतीने मिरच्या शेतीची लागवड केल्याने थोड्याच दिवसात मिरचीचे पीक हाती आले आहे.
पारंपारिक पद्धतीने केलेल्या मिरचीला केवळ फुल आले आहे. एक महिन्यात तोडणीवर येणार मिरची तंत्रशुद्ध पद्धतीने १५ दिवसाच्या अंतराने तोडणीवर येत आहे. आजपर्यंत गणेश मोहारे यांनी पाच लक्ष रुपयाची मिरचीचे उत्पादन काढले आहे. खर्च ंवजा जाता मिरचीची बाग ३० लक्ष रुपये नफा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रगतशिल शेतकऱ्याची तंत्रशुद्ध मिरचीची शेती बघण्यासाठी नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक विजय धावटे सिरहोली येथे आले होते. या प्रगतशिल शेतकऱ्याचा सन्मान यावर्षी जिल्हा परिषद येथे शेतीमित्र पुरस्काराने करण्यात आला आहे.