विज्ञानातील सत्यता तंत्रज्ञानानेच समजून घ्या

By Admin | Updated: November 7, 2015 00:32 IST2015-11-07T00:32:05+5:302015-11-07T00:32:05+5:30

विज्ञान नुसते वरवरच्या निरीक्षणातून शिकायचे नसते तर विज्ञानातील बारकावे बदलत्या तंत्रज्ञानातून विज्ञान कसे अभ्यासावे,...

Understand the authenticity of science in technology | विज्ञानातील सत्यता तंत्रज्ञानानेच समजून घ्या

विज्ञानातील सत्यता तंत्रज्ञानानेच समजून घ्या

विज्ञान व प्राणिशास्त्र मंडळाचे उद्घाटन : श्रीराम भुस्कुटे यांचे प्रतिपादन
साकोली : विज्ञान नुसते वरवरच्या निरीक्षणातून शिकायचे नसते तर विज्ञानातील बारकावे बदलत्या तंत्रज्ञानातून विज्ञान कसे अभ्यासावे, निसर्ग चक्र व विज्ञानाची सत्यता आपल्या कार्याच्या समर्पनातूनच शक्य होते, असे प्रतिपादन डॉ.श्रीराम भुस्कूटे यांनी केले.
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे व प्राणीशास्त्र मंडळाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळे तर प्रमुख पाहुणे भवभूती महाविद्यालय, आमगावचे प्राचार्य डॉ. श्रीराम भुस्कुटे व विज्ञान संस्था नागपूरचे प्राणिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के.सी. पाटील व शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे डॉ. बोबडे हे होते.
प्रास्ताविक विज्ञान मंडळाचे प्रभारी प्राध्यापक डॉ. एल.पी. नागपूरकर व प्राणीशास्त्र मंडळाचे प्रभारी डॉ. सी.जे. खूणे यांनी केले. वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या व अभ्यासक्रमात रूची निर्माण होण्याचे दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती दिली. डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांना विज्ञान अभ्यास करताना नव्या युगात प्रचंड वाव आहे की, त्यांनी आपल्या नाविण्यपूर्ण अभ्यासशैलीतून विज्ञानास संपन्न करावे, रानावनात व सर्वत्र भटकंती करावी. विज्ञान सत्य व निसर्गसत्य जाणावे व कृतीशिलता वाढवावी. डॉ. बोबडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांचे हिताचे दृष्टीने विज्ञानाद्रष्टा होवून या देशाला संपन्न करण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. अशोक काळे यांनी विज्ञान हे निष्ठेने, समर्पणाने व मनाच्या तन्मयतेने शिकावे व विविध उपक्रमांसाठी महाविद्यालय नेहमी सहकार्य करेल असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी विज्ञानाच्या विविध विषयावर तयार केलेल्या भिंतीचित्राच्या प्रदर्शनीचे उद्घाटन केले. विद्यार्थी व प्राध्यापकांना निरीक्षणासाठी खुले केले. जवळजवळ २०० विद्यार्थ्यांनी भिंतीचित्र तयार केले होते. संचालन अंकिता पूर्णये हिने केले.

Web Title: Understand the authenticity of science in technology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.