विनातिकीट प्रवाशांकडून अवैध वसुली

By Admin | Updated: June 1, 2015 01:07 IST2015-06-01T01:07:15+5:302015-06-01T01:07:15+5:30

तुमसर रोड तिरोडी रेल्वे गाडीतून विना तिकीट प्रवाशांकडून अवैध वसुली करणे सुरु असल्याची माहिती आहे.

Unauthorized recovery from VIP passengers | विनातिकीट प्रवाशांकडून अवैध वसुली

विनातिकीट प्रवाशांकडून अवैध वसुली

रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष : तुमसर-तिरोडी रेल्वे मार्गावरील प्रकार
तुमसर : तुमसर रोड तिरोडी रेल्वे गाडीतून विना तिकीट प्रवाशांकडून अवैध वसुली करणे सुरु असल्याची माहिती आहे. रेल्वे प्रशासनाने या मार्गावर काही दिवसांपूर्वी एका तिकीट तपासणीकाची नियुक्ती केली होती. विना तिकीट प्रवाशांकडून अवैध वसुली कोण करीत आहे याचा शोध घेण्याची तसदी रेल्वे प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
तुमसर रोड तिरोडी रेल्वे स्थानकादरम्यान प्रवासी रेल्वे गाडी दिवसातून चारदा ये जा करते. या मार्गावर रेल्वे प्रशासनाने एका तिकीट तपासणीकाही काही दिवसापूर्वी नियुक्ती केली आहे. पूर्वी तिकीट तपासणीस नसल्याने विना तिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी होती. रेल्वेचा महसूल यामुळे बुडत आहे.
विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करता यावी याकरिता तिकीट तपासणीस तुमसर शहर रेल्वे स्थानकावरून कर्तव्यावर जातात. विना तिकीट प्रवास करणारे प्रवासी यामुळे अलगद जाळ्यात अडतात. तिकीट तपासणीस नियमानुसार कारवाई करतात. परंतु अनेक प्रवाशांकडून अवैध वसुली करणारा दुसरा इसम कोण आहे हे गुलदस्त्यात आहे. गोबरवाहीनंतर अनेकदा तिकीट तपासणीस प्रवासी डब्यात दिसत नसल्याची माहिती आहे. सकाळी ९.३० च्या तुमसर रोड तिरोडी रेल्वे प्रवाशी गाडीत अतिशय गर्दी सध्या आहे. एकटा तिकीट तपासणीस या मार्गावर तिकीट तपासणीचे काम योग्यरितीने करूच शकत नाही. रेल्वेचा महसूल वाढण्याकरिता किमान दोन तिकीट तपासणीकांची रेल्वे प्रशासनाने नियुक्ती करणे आवश्यक आहे. या मार्गावर अनेक रेल्वे स्थानकावर भाडे तत्वावर तिकीट विक्री सुरु आहे. तुमसर रोड ते तिरोडी रेल्वे स्थानकादरम्यान १० ते ११ रेल्वे स्थानक येतात. तिकीट विक्री वाढावी अवैध प्रवासी वाहतूक बंद व्हावे याकरिता रेल्वे प्रशासन गंभीर नाही. रेल्वेची स्वतंत्र व्हिजीलेंस सेवा आहे. तिचा उपयोग या मार्गावर रेल्वे प्रशासन का घेत नाही हा संशोधनाचा विषय आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Unauthorized recovery from VIP passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.