बँकेने लावलेले सील तोडून घरात अनधिकृत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST2021-04-02T04:37:30+5:302021-04-02T04:37:30+5:30

भंडारा : कर्ज वसुलीसाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराला लावलेले बँकेचे सील तोडून अनधिकृत घरात प्रवेश करणाऱ्या इसमाविरुद्ध भंडारा ठाण्यात ...

Unauthorized entry into the house by breaking the seal affixed by the bank | बँकेने लावलेले सील तोडून घरात अनधिकृत प्रवेश

बँकेने लावलेले सील तोडून घरात अनधिकृत प्रवेश

भंडारा : कर्ज वसुलीसाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाने घराला लावलेले बँकेचे सील तोडून अनधिकृत घरात प्रवेश करणाऱ्या इसमाविरुद्ध भंडारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राजाराम गायधने रा.संभाजी लाॅनच्याजवळ स्टेशन रोड भंडारा असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी भंडारा अर्बन बँकेतून कर्ज घेतले होते. परंतु कर्जाची परतफेड केली नाही. या प्रकरणात कार्यकारी दंडाधिकारी विमल थोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून घराला सील लावले होते. परंतु २८ मार्च रोजी संजय गायधने यांनी घराचे सील तोडून अनधिकृत प्रवेश केला. विशेष म्हणजे याबाबत त्यांनी बँकेला व प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. हा प्रकार बँकेच्या लक्षात येताच भंडारा अर्बन बँकेचे व्यवस्थापक तथा प्राधिकृत अधिकारी बन्सीधर कारेमोरे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरुन संजय गायधने यांच्याविरुद्ध भादंवि ४४८, १८८ कलमान्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Unauthorized entry into the house by breaking the seal affixed by the bank