सोसायटीने बांधलेली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

By Admin | Updated: February 23, 2016 00:23 IST2016-02-23T00:23:25+5:302016-02-23T00:23:25+5:30

येथील ग्रामपंचायत आवारात अतिक्रमण करून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने बांधकाम केलेली ...

Unauthorized building collapsed by society | सोसायटीने बांधलेली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

सोसायटीने बांधलेली अनधिकृत इमारत जमीनदोस्त

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कारवाई : शहापूर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी हटविले अतिक्रमण
शहापूर : येथील ग्रामपंचायत आवारात अतिक्रमण करून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने बांधकाम केलेली व्यापारी संकुलाची अनाधिकृत इमारत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने शहापूर ग्रामपंचायतने जमिनदोस्त केली. इमारत ज्या जागेवर बांधलेली होती त्या जागेच्या मालकी हक्काबाबत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व ग्रामपंचायत यांच्यात न्यायालयात वाद सुरु होता. सोसायटीमध्ये सत्ताबदल होताच नवीन व्यवस्थापन समितीने मालकी नसल्याचे स्पष्ट केल्याने सदर जागेवर ग्रामपंचायतच्या मालकी हक्कावर शिक्कामोर्तब झाले होते.
शहापूर येथील ग्रामपंचायतचा गावठाणमध्ये समावेश आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण होण्यापूर्वी वादग्रस्त जागा ही ग्रामपंचायतच्या अखत्यारित होती. समोर ग्रामसेवक सदनिका मधात पटांगण व मागील भागात ग्रामपंचायत भवन व सभागृह होते. गावठाणात समाविष्ठ असलेल्या ग्रामपंचायत शेजारी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची जागा आहे. राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर सोसायटीने जुन्या गोदामाचे रुपांतर व्यापारी संकुलात केले. ग्रामपंचायतची जागा असलेल्या लगतच्या जागेत बांधकाम करण्यात आले. सेवा सहकारी संस्थेने तयार केलेले व्यापारी संकुलातील गाळे दुकानदारासोबत करारनामा करुन भाड्याने दिली. पैकी ग्रामपंचायतच्या जागेवर असलेल्या चार गाळ््याचा वाद न्यायालयात असताना संस्थेच्या जुन्या व्यवस्थापक मंडळाने जागा व गाळे संस्थेचेच असल्याबाबत अपिल केले होते. दरम्यानच्या काळात संस्थेत सत्ताबदल झाले. आता अस्तित्वात असलेल्या संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने वादग्रस्त जागेवरील मालकी हक्क मागे घेतला. भाडेकरूसोबत नवीन करारनामा करण्यास मनाई केली. सदर जागा संस्थेची नसल्याचा निर्वाळा संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाने केला. वादग्रस्त जागेसंबधी निर्णय ग्रामपंचायतच्या बाजूने लागल्यानंतर ग्रामपंचायतने सदर जागेवर असलेली व्यापारी संकुलांची इमारत पाडण्याची कार्यवाही सुरु केली. ग्रामपंचायतच्या जागेत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने अतिक्रमण पाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला त्यांच्या जागेत असलेले संस्थेचे अतिक्रमण काढण्याची परवानगी दिल्यानंतर ग्रामपंचायतने विविध कार्यकारी संस्थेला अतिक्रमण काढण्यासाठी सुचना दिली. भाडेकरुनासुध्दा गाळे रिकामे करण्याकरिता कळविले. मात्र त्याचे पालन करण्यात न झाल्याने जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार ग्रामपंचायतने संस्थेद्वारा करण्यात आलेले चार गाळ््याचे अतिक्रमण पाडण्याची कारवाई केली.जेसीबी मशीनद्वारे ग्रामपंचायतच्या जागेवर असलेले संस्थेचे अतिक्रमण भुईसपाट करण्यात येवून जागा मोकळी करण्यात आली. अतिक्रमण हटविते वेळी पोलीस निरिक्षक राजेंद्र नागरे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होता. यावेळी विस्तार अधिकारी भिमगिरी बोदेले, नायब तहसीलदार तेलंग, सरपंच अरुण कारेमोरे, उपसरपंच अलका रंगारी, ग्रामविकास अधिकारी आर.एन. डांगरे व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Unauthorized building collapsed by society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.