उमरेड-कऱ्हाडल्यात पर्यटन दरात कपात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:06 IST2017-11-28T00:00:28+5:302017-11-28T00:06:00+5:30
उमरेड, पवनी, कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाºया पर्यटकांकरिता आनंदाची बातमी असून २७ नोव्हेंबरपासून वाढविण्यात आलेले ....

उमरेड-कऱ्हाडल्यात पर्यटन दरात कपात
आॅनलाईन लोकमत
पवनी : उमरेड, पवनी, कऱ्हाडला अभयारण्याला भेट देणाऱ्यां पर्यटकांकरिता आनंदाची बातमी असून २७ नोव्हेंबरपासून वाढविण्यात आलेले प्रती व्यक्ती दर कमी करण्यात आले आहे.
पूर्वी प्रती पर्यटकास १८० रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात होते. ते आता ८० रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारण्यात येणार आहे. लहान मुलांकरिता ३० रुपये शुल्क राहणार आहे. एका जिप्सीमध्ये सहा पर्यटक जाऊ शकतात. या सहा पर्यटकांना पूर्वी १०८० रुपये शुल्क भरावे लागत असे आता केवळ ४८० रुपये त्यांना शुल्क भरावे लागणार आहे. मात्र शनिवार व रविवारला १० रुपये प्रति व्यक्ती शुल्कात अतिरिक्त वाढ राहणार असून जिप्सी व गाईडची दर जुनेच राहणार आहेत. शुल्क कमी झाल्यामुळे पर्यटकांची आता ६०० रुपयांची बचत होणार आहे. उमरेड, पवनी, कºहांडला अभयारण्यातील कºहांडला, पुल्लर, पवनी, गोठणगाव या चारही गेटवर हे नविन दर २७ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. पर्यटकांकरिता उमरेड, पवनी, कºहांडला, अभयारण्यातील पवनी अभयारण्यात सध्याला जयचंद वाघ, राई वाघीण वतिचे चार बछडे, पशुपक्षी, मोठ्या प्रमाणात असून या कमी झालेल्या दराची पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पवनी वनपरिक्षेत्राधिकारी दादाराव राऊत यांनी केले आहे. सध्या पर्यटकांची संख्या रोडावलेली होती. या कमी झालेल्या दरामुळे शासकीय तिजोरीत वाढ होणार हे निश्चित.