गोसीखुर्द धरणात ईकार्नियाचा विळखा

By Admin | Updated: January 9, 2017 00:25 IST2017-01-09T00:25:15+5:302017-01-09T00:25:15+5:30

विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणामध्ये ईकार्निया या पाणवनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Ukrainians block in Gosikhurd dam | गोसीखुर्द धरणात ईकार्नियाचा विळखा

गोसीखुर्द धरणात ईकार्नियाचा विळखा

लक्ष्मीकांत तागडे पवनी
विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणामध्ये ईकार्निया या पाणवनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या ईकार्निया ने मोठ्या प्रमाणात जलक्षेत्र व्यापले आहे. जिकडे पहावे तिकडे दुरपर्यंत ईकार्नीयाचा समुद्र दृष्टीस पडत आहे. या ईकार्नियामुळे गोसीखुर्द समोर एक नवीन समस्या आली आहे.
यापुर्वी ही ईकार्निया भंडारा येथील वैनगंगा नदीमध्ये होती. काही दिवसानंतर ही ईकार्निया पाण्याच्या प्रवाहाने गोसीखुर्द धरणामध्ये वाहत आली. गोसीखुर्द धरणाचे वक्रद्वारे बंद असल्यामुळे ही ईकार्निया वनस्पती धरणामधील पाण्यातच थांबली. या धरणामध्ये थांबलेल्या ईकार्निया ने हळू-हळू वाढण्यास सुरुवात केली. झपाट्याने वाढणाऱ्या या ईकार्निया ने संपुर्ण जलक्षेत्र व्यापून टाकले. त्यामुळे संपूर्ण धरण हिरवे दिसून लागले. धरणामध्ये पाणी आहे की नाही ही शंका येत राहिली.
ही ईकार्निया वनस्पती बिनउपयोगाची आहे. ईकार्नियाने संपुर्ण पाणी व्यापून टाकल्यामुळे सुर्याची किरणे पाण्यात पोहचू शकत नाही. त्यामुळे पाण्यातील माशांच्या वाढीवरती परिणाम होत आहे. या ईकार्नियामुळे धरणामध्ये मासेमारी करता येत नाही. त्यामुळे या बिनकामाच्या ईकार्निया ने धरणामधील पाणी झाकल्यामुळे धरणातील पाणी खराब होण्याचीही शक्यता नाकारता येवू शकत नाही. या ईकार्नियावर धरण विभाग व प्रशासनाने लवकरात लवकर नियंत्रण आणून नायनाट करण्याची गरज आहे. नाहीतर ही ईकार्निया संपुर्ण धरणातील जलक्षेत्र व्यापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पवनी येथील कुऱ्हाडा तलावातील ईकार्नियाचा नायनाट करण्यात आला. तो तलाव गोसीखुर्द पेक्षा किती तरी पटीने लहान होता. ज्या ठिकाणी गटाराचे पाणी जमा होते. त्या ठिकाणी ईकार्निया झपाट्याने वाढते. गोसीखुर्द धरणामध्ये नागनदीचे गटाराचे पाणी जमा झाल्यामुळे ईकार्निया मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जैवीक पध्दतीने ईकार्नियाचा नायनाट करावा लागेल.
- प्रकाश पचारे, अध्यक्ष भंजिमसं

Web Title: Ukrainians block in Gosikhurd dam