दोन वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम सुरूच

By Admin | Updated: May 15, 2016 00:21 IST2016-05-15T00:21:35+5:302016-05-15T00:21:35+5:30

आयुष्य संपलेल्या इमारतीत शासकीय मुलींचे वसतिगृह भाड्याने सुरू आहे.

For two years the construction of the hostel has been continued | दोन वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम सुरूच

दोन वर्षांपासून वसतिगृहाचे बांधकाम सुरूच

तुमसरातील प्रकार : ८ कोटीपैकी ३.५० कोटी रूपये मिळाले
तुमसर : आयुष्य संपलेल्या इमारतीत शासकीय मुलींचे वसतिगृह भाड्याने सुरू आहे. आदिवासी विभागातर्फे तुमसर शहरात मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. आदिवासी मंत्रालयाने आतापर्यंत केवळ ३ कोटी ५० लक्षाचा निधी दिला. उर्वरित पाच कोटीच्या निधीची येथे प्रतीक्षा आहे. या वसतीगृह इमारतीच्या बांधकामावर राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्र्यांनी दोनदा भेट दिली हे विशेष.
तुमसर शहरात रेल्वे स्थानकाजवळ मागील दोन वर्षापासून मुलामुलींचे वसतिगृह इमारतीचे बांधकाम कासवगतीने सुरू आहे. मुले ७५ व मुली ७५ अशी क्षमता या वसतिगृहाची आहे. राज्य शासनाने वसतिगृहाकरिता ३ कोटी ५० लक्षाचा निधी दिला आहे. उर्वरित ५ कोटी निधीची अजून प्रतिक्षा आहे. वसतिगृहाचे बांधकाम निधीअभावी अपूर्णावस्थेत आहे. वसतिगृह बांधकामासंदर्भात अनेकदा आदिवासी संघटनेनी शासन व प्रशासनाला वस्तुस्थितीचे निवेदन दिले. वसतिगृह बांधकाम स्थळ व सद्यस्थितीत आयुष्य संपलेल्या भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहाला राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री राजे अंम्ब्रीशराव आत्राम यांनी भेट देवून पाहणी केली होती. भाड्याच्या इमारतीत जीव मुठीत घेवून ७५ विद्यार्थीनी वास्तव्याला आहेत.
भाड्याच्या इमारतीत सुरू असलेल्या वसतिगृहाचा मुख्य कार्यालयाला कर न भरल्याप्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने सील ठोकले होते. यामुळे आदिवासी मुलींच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे. यासंदर्भात आदिवासी संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास राज्यमंत्र्यांना तहसीलदारांमधील निवेदन पाठविले.
नवीन शैक्षणिक सत्रापासून शासनाने मुला-मुलींचे वसतिगृहाचे बांधकाम पूर्ण करावे अन्यथा २४ जून रोजी आदिवासी मुलामुलींचे शासकीय वसतिगृह नवीन इमारतीसमोर धरणे, उपोषण, रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिष्टमंडळात माजी भाजप आदिवासी आघाडीचे अध्यक्ष अशोक उईके, माजी पं.स. सदस्या प्रभा पेंदाम, नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, आदिवासी विद्यार्थी संघ, तुमसरचे अध्यक्ष दिनेश मरस्कोल्हे, धनराज इळपाचे, विकास मरस्कोल्हे, नरेंद्र मडावी, हीना मडावी, निकिता सराटे, कैलास गजाम, सुभाष धुर्वे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: For two years the construction of the hostel has been continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.