बीड येथील दोन महिला पंढरपूर येथील अपघातात ठार
By Admin | Updated: August 31, 2014 23:34 IST2014-08-31T23:34:54+5:302014-08-31T23:34:54+5:30
एकीचे बळ घेऊन पंढरीच्या वारीला जाणाऱ्या बचत गटाच्या महिलांच्या गाडीला अपघात झाला. त्यात दोन महिला जागीच ठार झाल्या. एका महिलेची प्रकृती गंभीर असून चार महिला अपघातात जखमी झाल्या आहेत.

बीड येथील दोन महिला पंढरपूर येथील अपघातात ठार
तीर्थयात्रेवर विरजण : मृतक बचत गटातील सदस्य
भंडारा : एकीचे बळ घेऊन पंढरीच्या वारीला जाणाऱ्या बचत गटाच्या महिलांच्या गाडीला अपघात झाला. त्यात दोन महिला जागीच ठार झाल्या. एका महिलेची प्रकृती गंभीर असून चार महिला अपघातात जखमी झाल्या आहेत.
केंद्र पुरस्कृत आदर्श ग्राम बिड सितेपार येथील महिला बचत गटाच्या चोवीस महिला ऋषी पंचमीनिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी टाटा सुमोने गुरुवारच्या सायंकाळी पंढरपूरच्या प्रवासासाठी निघाल्या होत्या.
पंढरीच्या विठ्ठलावर यांची अगाढ श्रद्धा घेऊन जाणाऱ्या महिलांच्या एका टाटा सुमो गाडीचा पंढरपूर शेजारच्या गोसावीवाडी पाटीजवळ भीषण अपघात झाला. त्या अपघातात दुर्गा गुलजारसिंग शक्करवार (५३), जायत्रा भय्या राऊत (५९) या महिला जागीच ठार झाल्या.
त्याच गाडीतील सर्वसती सुकराम बावनकुळे ही महिला अधीकच गंभीर झाली. तसेच सुजिता अशोक शहारे, सुशीला केशव शहारे, लिला शामराव शहारे यांच्यावर चालक गुरुदेव बावनकुळे हा जखमी झाले आहेत. हा अपघात ३० आॅगस्ट रोजी सकाळी ६ वाजता दोन किलोमीटर पंढरपूरच्या अलीकडे गोसावीवाडी येथे झाला. मृतक महिलेचे शवविच्छेदन पंढरपूर जवळील रुग्णालयात करण्यात आला.
तसेच जखमी महिलेवर उपचार करण्यात आले. मृतक महिलांचे शव बीड गावात आज सायंकाळी ६ वाजता पोहचले आहे. (तालुका प्रतिनिधी)