दुचाकीची बसला जोरदार धडक
By Admin | Updated: October 26, 2014 22:35 IST2014-10-26T22:35:19+5:302014-10-26T22:35:19+5:30
वर्धेहून गोंदियाकडे जाणारी एस.टी. बसला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकीने धडक दिली. यात दुचाकी चालक वसंत येलादे (५०) रा. जवाहरनगर हे जखमी झाले. जखमीला खासगी

दुचाकीची बसला जोरदार धडक
जवाहरनगर : वर्धेहून गोंदियाकडे जाणारी एस.टी. बसला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्नात असलेल्या दुचाकीने धडक दिली. यात दुचाकी चालक वसंत येलादे (५०) रा. जवाहरनगर हे जखमी झाले. जखमीला खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सकाळी १० वाजता दरम्यान ठाणा पेट्रोलपंप येथे घडली.
तिरोडा आगाराची वर्धा-गोंदिया बस एमएच-४०/एन-८९८३ ही ३२ प्रवासी घेऊन भंडारा दिशेने जात होती. दरम्यान बाजारामधून साहित्य खरेदी करीत ठाणा पेट्रोलपंप येथील राष्ट्रीय महामार्गावरील नागपूरकडील बोगद्यामधून रस्ता ओलांडीत असताना बसला दुचाकी एमएच-३१/बीक्यु-९०९४ ने धडक दिली.
बसचालकाने समयसूचकता दाखवीत दुचाकीस वाचविण्याच्या प्रयत्न केले. मात्र सुदैवाने दुचाकीसह चालक १५ फूट फरकटत समोर गेला. ग्रामस्थांनी बसमधील समोरील चाकात फसलेल्या दुचाकी चालकास काढण्यात आले. ठाणा येथील जागृक नागरिक सुनील दयाल खन्ना यांनी सहकाऱ्यासह लगेच आपल्या वाहनाद्वारे जखमीला भंडारा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एस.टी. बस मधील प्रवाशांच्या कुठल्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. याप्रकरणी दोन्ही पक्षाकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. दरम्यान ठाणा पेट्रोलपंप येथील सर्व्हिस रोडवर, उड्डाण पुलादरम्यान बोगद्यामध्ये स्पिट ब्रेकरची मागणी जनतेनी लावून धरली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)