मारुती व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:25 IST2021-02-19T04:25:20+5:302021-02-19T04:25:20+5:30

माेहाडी : भरधाव मारुती व्हॅनने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा- तुमसर मार्गावर माेहाडी ग्रामीण रुग्णालयाजवळ बुधवारी ...

Two-wheeler seriously injured in Maruti van collision | मारुती व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

मारुती व्हॅनच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर

माेहाडी : भरधाव मारुती व्हॅनने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा- तुमसर मार्गावर माेहाडी ग्रामीण रुग्णालयाजवळ बुधवारी रात्री ७ वाजता घडली. या अपघातात मारुती व्हॅनही रस्त्याच्या कडेला जाऊन उलटल्याने दाेन जण किरकाेळ जखमी झाले. भंडारा येथून मारुती व्हॅन क्रमांक एम एच४० बीई ६४६३ तुमसरकडे जात हाेती. माेहाडी ग्रामीण रुग्णालयाजवळ समाेरुन येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. त्यात अक्षय भास्कर सेलाेकर (१९) रा. राेहणा हा गंभीर जखमी झाला तर मारुती व्हॅन उलटल्याने चालक प्रमाेद हरिशचंद्र काेहाड आणि किशाेर नारायण हेडाऊ दाेघे रा. गांधी वाॅर्ड माेहाडी जखमींना जवळच असलेलया ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅ. याेगीता बैसारे परिचारिका रुबीना हुसैन यांनी प्राथमिक उपचार करुन दुचाकीस्वाराला भंडारा येथे रवाना केले. अपघात एवढा भीषण हाेता की, दुचाकीचा चुराडा झाला.

Web Title: Two-wheeler seriously injured in Maruti van collision