नादुरुस्त टॅंकरवर आदळून दुचाकीस्वार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:41 IST2021-02-20T05:41:32+5:302021-02-20T05:41:32+5:30

निखील केवळराम पंचबुध्दे (२६) रा. खुर्शीपार गुंथारा असे मृताचे नाव आहे. ताे अर्जुनी जुनी येथे विलास शेंडे यांच्या लग्नाच्या ...

Two-wheeler killed in collision with faulty tanker | नादुरुस्त टॅंकरवर आदळून दुचाकीस्वार ठार

नादुरुस्त टॅंकरवर आदळून दुचाकीस्वार ठार

निखील केवळराम पंचबुध्दे (२६) रा. खुर्शीपार गुंथारा असे मृताचे नाव आहे. ताे अर्जुनी जुनी येथे विलास शेंडे यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला गुरुवारी गेला हाेता. तेथून ताे आपल्या गावाकडे जात हाेता. काेकणागढ फाट्यावर नादुरुस्त एक टॅंकर उभे हाेते. त्यावर जावून निखीलची दुचाकी आदळली. त्यात ताे गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला भंडारा येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले. याप्रकरणी रमेश शामराव पंचबुध्दे यांनी कारधा पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरुन पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पाेलीस निरीक्षक परशुरामकर करीत आहे.

राष्ट्रीय महामार्गावर अनेक वाहने रस्त्याच्या कडेला उभे असतात. पंरतु सुरक्षेची काेणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे अशा अपघातास नाहक बळी जातात.

Web Title: Two-wheeler killed in collision with faulty tanker