ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाेघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST2021-01-03T04:35:35+5:302021-01-03T04:35:35+5:30
लाखांदूर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दाेन जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाेघे ठार
लाखांदूर : भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दाेन जण जागीच ठार झाले. ही घटना शनिवारी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपळगाव काे. येथे दुचाकीने लाखांदूर तालुक्यातील पिंपळगावकडे येत असताना घडली.
ऋषी गाेविंदा खाेब्रागडे (४२) रा.ताडगाव, ता. अर्जुनी माेरगाव आणि राजेंद्र मनिराम शेंडे (३६) रा. पिंपळगाव काे. ता. लाखांदूर अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी सकाळी ऋषी आणि राजेंद्र आपल्या दुचाकीने (एम एच ३५ क्यू. ७९२५) अर्जुनी माेरगाव येथून लाखांदूर तालुक्यातील पिंपळगावकडे येत हाेते. त्यावेळी राज्यमार्गावर समाेरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (सीजी ०८ एल २१५५) दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी भीषण हाेती की दाेघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली. गावकऱ्यांनी लाखांदूर पाेलिसांना अपघाताची माहिती दिली. ठाणेदार मनाेहर काेरेटी, पाेलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अंमलदार मनीष चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची तक्रार बलराम गाेविंदा खाेब्रागडे यांनी लाखांदूर ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ट्रक चालक तामेश्वर चमाराॅय शाहू (२१) रा. पटपर ता. डाेंगरगष जि. राजनांदगाव याला अटक करण्यात आली. या अपघाताने गावात हळहळ व्यक्त हाेत आहे.