दुचाकींची टक्कर, एक ठार दाेन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:44 IST2020-12-30T04:44:40+5:302020-12-30T04:44:40+5:30

बिरजू कामसुतकर (४५) रा. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. तर याेगेश प्रमाेद गजभिये (१९) रा. पिंपळगाव काे. आणि प्रशांत ...

Two-wheeler collision, one killed | दुचाकींची टक्कर, एक ठार दाेन गंभीर

दुचाकींची टक्कर, एक ठार दाेन गंभीर

बिरजू कामसुतकर (४५) रा. लाखांदूर असे मृताचे नाव आहे. तर याेगेश प्रमाेद गजभिये (१९) रा. पिंपळगाव काे. आणि प्रशांत केशव मस्के (३२) रा.लाखांदूर असे जखमींची नावे आहेत. साेमवारी रात्री याेगेश गजभिये हा आपल्या दूचाकीने (एम एच ३६ एस ५१६६) लाखांदूर टी-पाईंटकडून वडसाकडे जात हाेता. त्याचवेळी बिरजू कामसुतकर आपल्या दुचाकीवर एका मित्राला घेवून लाखनीकडे येत हाेता. येथील हाॅटेल रियानसमाेर या दाेन दुचाकी एकमेकावर आदळून टक्कर झाली. त्यात दाेन्ही दुचाकीवरील चालक गंभीररित्या जखमी झाले. नागरिकांनी जखमींना तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने तिघांना भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बिरजू कामसुतकर याचा मृत्यू झाला. या घटनेची नाेंद लाखांदूर पाेलिसांनी घेतली आहे. अधिक तपास ठाणेदार मनाेहर काेरेटी यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरीक्षक अमरदीप खाडे करीत आहे.

Web Title: Two-wheeler collision, one killed