लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कुत्र्याने पाठलाग केल्याने घाबरलेल्या स्वाराने दुचाकी भरधाव पळविली. मात्र नियंत्रण जावून दुचाकी चिंचोळ्या गल्लीतील एका भिंतीवर आदळली. त्यात डोक्याला मार लागून तरूण ठार झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील शिवाजीनगरात घडली. बेवारस कुत्र्यांची शहरात चांगलीच दहशत असून आता नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.राकेश रामप्रभू सार्वे (३०) रा. शिवाजीनगर असे मृताचे नाव आहे. राकेश बुधवारी रात्री आपल्या दुचाकीने घराबाहेर निघाला. शिवाजी नगरातील एका कुत्र्याने त्याचा पाठलाग केला. त्यामुळे राकेश घाबरला. दुचाकी अनियंत्रित होवून चिंचोळ्या गल्लीतील एका भिंतीवर आदळली. त्यात राकेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात तो काहीवेळ पळून होता हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला भंडारा येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र वरठी गावाजवळ त्याचा मृत्यू झाला. राकेश हा व्यवसायाने पेंटर होता. कमी वेळात त्याने आपल्या व्यवसायाची प्रगती केली होती. शहरात त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.मोकाट कुत्र्यांना आवराशहरात गत काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्रीच्यावेळी झुंडीने फिरणारे कुत्रे वाहनाच्या मागे लागतात. त्यामुळे वाहनधारक घाबरून जातात. अशा प्रकारात एका तरूणाचा बळी गेला. या मोकाट कुत्र्यांचा नगरपरिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
दुचाकी भिंतीवर आदळून तरूण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 00:54 IST
कुत्र्याने पाठलाग केल्याने घाबरलेल्या स्वाराने दुचाकी भरधाव पळविली. मात्र नियंत्रण जावून दुचाकी चिंचोळ्या गल्लीतील एका भिंतीवर आदळली. त्यात डोक्याला मार लागून तरूण ठार झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास येथील शिवाजीनगरात घडली. बेवारस कुत्र्यांची शहरात चांगलीच दहशत असून आता नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.
दुचाकी भिंतीवर आदळून तरूण ठार
ठळक मुद्देतुमसरची घटना : कुत्र्यांनी केलेला पाठलाग जीवावर बेतला