दोन ट्रकची धडक
By Admin | Updated: February 23, 2015 01:06 IST2015-02-23T01:06:18+5:302015-02-23T01:06:18+5:30
रविवारी पहाटे झालेल्या दोन ट्रकच्या धडकेत ट्रक वाहक गंभीर जखमी झाले आहेत. तहसिल कार्यालयापुढे ही घटना घडली.

दोन ट्रकची धडक
वाहक जखमी : तहसील कार्यालयापुढील घटना
लाखांदूर : रविवारी पहाटे झालेल्या दोन ट्रकच्या धडकेत ट्रक वाहक गंभीर जखमी झाले आहेत. तहसिल कार्यालयापुढे ही घटना घडली. या अपघातातील जखमींवर ग्रामीण सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिवलिंगम सिरकर गाऊंडर रा. तामिळनाडू (संकेरी) जि. सेलम (५२) असे जखमीचे नाव आहे. पहाटे तामिळनाडू येथून ट्रक लाखांदूरमार्गे कोलकात्याकडे जात असताना एका मागोमाग असलेले ट्रक पुढच्याने ट्रक थांबविल्यामुळे मागच्या ट्रक चालकाने जोरात पुढच्या ट्रकला टक्कर दिली. धडक एवढी जोरात होती की मागच्या ट्रक चालकाला ट्रकचा समोरचा भाग तोडून एक तासाच्या प्रयत्नानंतर बाहरे काढण्यात आले. त्यामुळे काही काळ वाहतूक प्रभावित झाली होती.
वाहतूक पोलीस अरविंद अंबादे याने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त ट्रक टी. एन. ५२ ऐ ८२६९ हा पूर्णत: क्षतिग्रस्त असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
(तालुका प्रतिनिधी)