दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 00:51 IST2018-05-06T00:51:02+5:302018-05-06T00:51:02+5:30

संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली.

Two teachers tortured a girl student | दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार

दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार

ठळक मुद्देलाखनी येथील घटना : एकाला अटक-दुसरा शिक्षक फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. परंतु भयभीत झाल्यामुळे या मुलीने कुठलिही वाच्यता केली नाही. दरम्यान, आज शनिवारला हा प्रकार आईवडिलांना सांगितल्यानंतर याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
याप्रकरणात लाखनी पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली असून दुसरा शिक्षक फरार आहे. लाखनी येथील आदर्श नगरातील दोन शिक्षकांनी दि.२ मे रोजी दुपारी १ वाजता शिक्षक थानसिंग बिसेन (४०) याने केसलवाडा (पवार) येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लाखनी येथे एमएससीआयटी या संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे सांगून स्वत:च्या दुचाकीने आणले.
तिला आदर्श नगर येथील हिवराज कमाने (४२) या शिक्षकाच्या घरी घेऊन गेले. त्या ठिकाणी दोन्ही आरोपी शिक्षकांनी तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी हिवराज कमानेला अटक केली असून या मुलीला दुचाकीवर आणणारा थानसिंग बिसेन हा शिक्षक फरार असून पोलीस त्याच्यावर मागावर आहेत.
याप्रकरणी तक्रारीवरून लाखनी पोलिसांनी भादंवि ३७६ (२) (फ) ३७६ (ड) सहकलम ४, १० लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियम सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ नुसार दोन्ही आरोपीविरूद्ध गुन्हे दाखल केले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले हे करीत आहेत.

Web Title: Two teachers tortured a girl student