साेमेवाडा येथे दोन शिक्षकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:44 IST2021-07-07T04:44:18+5:302021-07-07T04:44:18+5:30

विलास ऊर्फ कैलाश शंकर बडगे (३७, रा. साेमेवाडा) असे आराेपी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी साेमेवाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक ...

Two teachers beaten at Samewada | साेमेवाडा येथे दोन शिक्षकांना मारहाण

साेमेवाडा येथे दोन शिक्षकांना मारहाण

विलास ऊर्फ कैलाश शंकर बडगे (३७, रा. साेमेवाडा) असे आराेपी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी साेमेवाडा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रामकृष्ण गिरीपुंजे आणि सुरेश गिरीपुंजे सेतू कार्यक्रमाविषयी कार्यालयात बसून चर्चा करीत हाेते. दुपारी १ वाजेच्या सुमारास विलास तेथे पुस्तक मागण्यासाठी आला. त्यावरून वाद झाला. या वादात शिक्षक रामकृष्ण गिरीपुंजे यांची काॅलर पकडून मारहाण केली. तसेच शिक्षक सुरेश गिरीपुंजे यांनाही मारहाण केली. याप्रकरणी लाखनी ठाण्यात तक्रार देण्यात आली. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा विलास बडगे विरुद्ध नाेंदविण्यात आला. या घटनेचा तपास पाेलीस निरीक्षक मनाेज वाढीवे यांच्या मार्गदर्शनात सहायक पाेलीस निरीक्षक, हवालदार सुभाष राठाेड, प्रमाेद टेकाम, मुकेश गायधने करीत आहेत. या घटनेने गावात खळबळ उडाली हाेती.

Web Title: Two teachers beaten at Samewada