शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या मैदानावर वीज काेसळली, दोन विद्यार्थिनी जखमी; लाखांदूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2022 18:34 IST

सोनीची घटना : लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचार

लाखांदूर (भंडारा) : शाळेच्या मैदानावर वीज कोसळून दोन विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्याची घटना तालुक्यातील सोनी येथील लोकमान्य विद्यालयात मंगळवारी (दि. १९) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही विद्यार्थिनींवर लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैष्णवी अरविंद वावरे (१५, रा. मेंढा) आणि आचल तेजराम वाघधरे (१५, रा. इंदोरा, ता. लाखांदूर) अशी जखमी विद्यार्थिनींची नावे आहेत. मंगळवारी दुपारची सुटी झाल्याने विद्यार्थी वर्गाबाहेर आले होते. वैष्णवी आणि आचल मैदानाकडून वर्गखोलीकडे परत जात असताना अचानक वीज कडाडली आणि शाळेच्या मैदानावर कोसळली. त्यात या दोन्ही विद्यार्थिनी खाली कोसळून किरकोळ जखमी झाल्या.

या दोघींनाही शिक्षकांनी तत्काळ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोन्ही विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेची माहिती लाखांदूर येथील पोलिसांसह महसूल विभागाला देण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच लाखांदूरचे गटशिक्षणाधिकारी तत्त्वराज अंबादे यांनी ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

टॅग्स :AccidentअपघातStudentविद्यार्थीbhandara-acभंडारा