ट्रकच्या धडकेत दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:30 IST2018-02-11T23:30:02+5:302018-02-11T23:30:21+5:30
नागपूर येथून रायपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले.

ट्रकच्या धडकेत दोन गंभीर
आॅनलाईन लोकमत
भंडारा : नागपूर येथून रायपूरकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकने विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वारांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारला सकाळी ११.२५ वाजता करचखेडा येथे घडली.
शामकरण मडावी (४५), गणेश सपाटे रा. कोडेलोहारा त. तिरोडा, जि. गोंदिया असे जखमीचे नाव आहे. कारधा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शामकरण व गणेश हे दोन मित्र एम एच ३६ आर ७४१० या दूचाकीने नागपूरकडे जात होते. दरम्यान नागपूर येथून रायपूरकडे जी जे ०१ सीजेड ४९३३ हा ट्रेलर भरधाव जात होता. करचखेडा वळणावर ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. व घटनेची माहिती कारधा पोलिसांना दिली. या भीषण अपघातास जबादार असलेल्या ट्रेलर चालकाविरुध्द कारधा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार लेकचंद मनगटे करीत आहे.