शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

चाकूच्या धाकावर लुटणारे दोघे गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 21:19 IST

सिनेस्टाइल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी करून ट्रकला अडविले, तसेच ट्रकचालक मनोज बडवाईक याला कोयता व चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले, तसेच त्याच्याकडे असलेली १७ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. बडवाईक यांनी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तब्बल तीन महिन्यांपूर्वी कोयता व चाकूच्या धाकावर एका ट्रक चालकाला लुटणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी शेर ऊर्फ हर्षद राहुल मेश्राम (२४), रा. नेहरू वाॅर्ड वरठी व एका विधिसंघर्षग्रस्त बालकाचा अटक करणाऱ्यांमध्ये समावेश आहे. शेरूला नागपूर येथून रविवारी पकडण्यात आले.माहितीनुसार २७ सप्टेंबर २०२१ रोजी मोहाडी तालुक्यातील कुशारी येथील रहिवासी असलेले मनोज सुरसराम बडवाईक हे ट्रकमधील गिट्टी खाली करण्यासाठी पांढराबोडी येथे आले होते. याचवेळी शेरू ऊर्फ हर्षद मेश्राम व त्याच्यासोबत एक अल्पवयीन बालक दुचाकीवर आले. सिनेस्टाइल पद्धतीने ट्रकसमोर दुचाकी आडवी करून ट्रकला अडविले, तसेच ट्रकचालक मनोज बडवाईक याला कोयता व चाकूचा धाक दाखवून ट्रकच्या केबिनमधून खाली खेचले, तसेच त्याच्याकडे असलेली १७ हजार रुपयांची रोकड व मोबाइल जबरीने हिसकावून पळ काढला. बडवाईक यांनी वरठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण,  एपीआय नितीनचंद्र राजकुमार, भूषण पवार, पीएसआय विवेक राऊत, हेडकॉन्स्टेबल नितीन महाजन, पोलीस नाईक शैलेश बेदूरकर, नंदकिशोर मारबते, प्रफुल्ल कठाणे व स्नेहल गजभिये यांचा चमू कामाला लागला. एपीआय राजकुमार व पीएसआय विवेक राऊत यांनी गोपनीय माहिती काढली. यात सदर गुन्हा हा शेरू ऊर्फ हर्षद राहुल मेश्राम याने त्याच्या साथीदारांसह केला असावा असा कयास बांधला. त्याच वेळेपासून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शेरूच्या मागावर होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर येथे कारवाई करीत रविवारी पहाटेच्या सुमारास शेरूला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने एका विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या सोबतीने घटनेला अंजाम दिल्याचे कबूल केले. 

शेरू हा सराईत गुन्हेगार - शेरू हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याने घटनेनंतर मुंबई येथे पळ काढला होता. दरम्यान, शेरू हा नागपूर येथे त्याच्या मित्राच्या घरी लपलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी