रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा जबर धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:37 IST2021-04-23T04:37:56+5:302021-04-23T04:37:56+5:30

तुमसर: रेल्वेच्या उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक काम करताना दोन कर्मचाऱ्यांना जबर विजेचा धक्का बसला. ही घटना तुमसर रोड स्टेशन यार्डात ...

Two railway employees were electrocuted | रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा जबर धक्का

रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना विजेचा जबर धक्का

तुमसर: रेल्वेच्या उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक काम करताना दोन कर्मचाऱ्यांना जबर विजेचा धक्का बसला. ही घटना तुमसर रोड स्टेशन यार्डात गुरुवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. यात एक कर्मचारी ६० ते ७० टक्के भाजला तर दुसरा कर्मचारी खाली पडल्याने त्याचे पायाचे हाड मोडले.

रामलाल वहिले, चंद्रशेखर साबळे अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गुरुवारी डाऊन लाईनवर उच्च दाब वाहिनीचे तांत्रिक काम करीत होते. दरम्यान, रामलाल व चंद्रशेखर यांना विजेचा धक्का लागला. ते जखमी झाले. इतर कर्मचारी सुदैवाने बचावले. या घटनेमुळे स्टेशन यार्डात एकच धावपळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर नागपूर येथे पाठविण्यात आले.

प्रवाह खंडित केल्यानंतर सदर विजेचा पुरवठा कसा झाला याची चौकशी करण्याकरता संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी तुमसर रोड रेल्वे यार्ड येथे भेट देणार आहेत.

चार महिन्यापूर्वी या रेल्वे यार्डात अशीच यापूर्वी घटना घडली होती. प्रकरणाची दखल घेण्याची मागणी भंडारा जिल्हा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मनोज चौबे यांनी विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांना केली आहे.

कोट

तुमसर रोड येथील रेल्वे यार्डात डाऊन लाईनवर दोन तांत्रिक कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. तत्पूर्वी संबंधित विभागाने ब्लॉक घेतला होता. परंतु कामादरम्यान दोन कर्मचाऱ्यांना विजेचा धक्का बसला. या सर्व प्रकरणाची संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करता येणार आहेत त्यानंतरच सर्व उलगडा होईल.

राजेश गिरी, स्टेशन अधीक्षक, तुमसर रोड.

Web Title: Two railway employees were electrocuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.