दोन तोतया अधिकारी गजाआड

By Admin | Updated: May 20, 2017 01:01 IST2017-05-20T01:01:22+5:302017-05-20T01:01:22+5:30

जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्त धान्य दुकानदाराकडून

Two pamphlets run away | दोन तोतया अधिकारी गजाआड

दोन तोतया अधिकारी गजाआड

बघेडा येथील प्रकार : मुख्य सूत्रधार फरारच
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातील अधिकारी असल्याची बतावणी करुन स्वस्त धान्य दुकानदाराकडून पैसे उकळााऱ्या दोन तोतया अधिकाऱ्यांना गजाआड करण्यात गोबरवाही पोलिसांना यश आले. रामदास आत्माराम पडोळे रा. हिवरा ता. मोहाडी, समाजपाल धन्नू भवसागर रा. कांद्री ता. मोहाडी जि. भंडारा असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नावे आहेत. तर या तोतया अधिकाऱ्यांचा शेंडे नामक मुख्य सूत्रधार घटना स्थळावरुन पळ काढण्यात यशस्वी ठरला.
बघेडा येथील गोपीचंद गायकवाड यांच्या स्वस्त धान्य दुकानात १७ मे २०१७ ला सकाळी १० ते १०.१५ वाजतादरम्यान तिन इसम आले. त्यांनी आम्ही डीएसओ कार्यालयाचे अधिकारी आहोत अशी खोटी बतावणी करुन दुकानदाराला दोन हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास तुझे दुकान बंद पाडू अशी धमकी दिली. त्यारुन दुकानदार गायकवाड त्या अधिकाऱ्यांवर संशय आल्याने त्याचे त्याबाबद माहिती काढली व त्यांना बोलण्यात अडकवून ठेवत गावातील सरपंच आदींना बोलावून हकीकम सांगितली. त्या दरम्यान तोतया अधिकाऱ्याचा मुख्य सुत्रधार याने पळ काढला व दोन तोतयांना गावकऱ्यांनी पकडून ठेवत गोबरवाही पोलिसांना पाचारण करुन त्यांच्या स्वाधिन केले.तुमसर तालुक्यात गत दोन तीन महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानदाराकडे जावून डीएसओ कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी सांगून पैसे उकळण्याचा प्रकार येथे सुरु होता. अनेक दुकानदार त्यास बळीही पडले. मात्र गोपीचंद गायकवाड या स्वस्त धान्य दुकानदाराच्या समयसुचकतेमुळे तोतया अधिकाऱ्यांना अद्दल घडली आहे.

Web Title: Two pamphlets run away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.