दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

By Admin | Updated: September 5, 2015 00:41 IST2015-09-05T00:41:41+5:302015-09-05T00:41:41+5:30

शिक्षक दिनाच्या पूवसंध्येला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला.

Two lakh students took advantage of | दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

दोन लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

भंडारा : शिक्षक दिनाच्या पूवसंध्येला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. त्यांनी मार्गदर्शनात विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जागृत करुन यशस्वी जीवनाचे मुलमंत्र दिले.
प्रधानमंत्र्यांच्या भाषणाचा सीधा प्रसारण जिल्ह्यातील सर्व १,३३१ शाळेतील दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने आत्मसात केली. जिल्ह्यातील सर्व १,३३१ शाळांमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. काही शाळांमध्ये प्रधानमंत्र्यांचे भाषण ओवरहेड प्रोजेक्टर आणि दुरचित्रवाणीच्या स्क्रीनवर दाखविण्यात आला. ज्या शाळांमध्ये व्यवस्था झाली नाही, त्याठिकाणी रेडियोवर भाषण ऐकविण्यात आला. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने स्वत:ला रोबोट बनण्यापासून रोखले पाहिजे. कलेच्या साधनेशिवाय व्यक्ती रोबोट बनतो आणि संवेदना गमावून बसतो, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी प्रत्येक विद्यार्थ्याने एखाद्या कलेची आयुष्यभर साधना केली पाहिजे, असा गुरुमंत्र देशभरातील विद्यार्थ्यांना दिला. शिक्षकदिनाच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
ते म्हणाले, शिक्षक दिन हा शिक्षकांच्या तपस्येचे स्मरण करण्याचा दिवस आहे. डॉक्टरांनी एखादी मोठी शस्त्रक्रिया केली तर त्याला मोठी प्रसिद्धी मिळते. मात्र, असे हजारो डॉक्टर, इंजिनिअर घडवणाऱ्या डॉक्टरांचे स्मरण केले जात नाही. देशाला आज जे काही चांगले डॉक्टर आणि शिक्षक मिळाले, त्यामागे शिक्षकाचे योगदान आहे. त्यांच्या तपस्येमुळेच हे शक्य झाले आहे. विद्यार्थी हीच शिक्षकांची ओळख असतात. ते आपल्या पराक्रमाने गुरुजनांचे नाव मोठे करतात. आई मुलाला जन्म देते, पण त्याला जीवन देण्याचे काम शिक्षक करत असतात.
शिक्षक कधीही निवृत्त होत नसतात, असे सांगून मोदी यांनी शिक्षकांनी आठवणीतल्या विद्यार्थ्यांबद्दल लिहिले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. लहान मुलांकडून जे काही शिकायला मिळते, ते इतर कुठेच शिकायला मिळत नाही. सभोवताली घडणाऱ्या घटनांचा लहान मुले आरसा असतात, असेही त्यांनी सांगितले.
कटकवार विद्यालय, साकोली
स्थानीय कृष्णमुरारी कटकवार विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात संवाद कार्यक्रम शाळेच्या पटांगणावर टि.व्ही. संच लावून दाखविण्यात आला. टि.व्ही. व डिजीटल प्रोजेक्टर चा वापर करुन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलेले प्रधानमंत्रीचे सकारात्मक उत्तरे एकुण विद्यार्थी-शिक्षक उत्साहित झाले. एकुण १४०० विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.साकोली तालुक्यातील एकुण १५५ विद्यालयात सोयीनुसार प्रोजेक्टर, टि.व्ही. लावून पंतप्रधानांचा संवाद कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. पं.समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष बावणकुळे यांनी ही माहिती दिली.
राष्ट्रीय विद्यालय, भंडारा
शालेय विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद हा कार्यक्रम दुरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. राष्ट्रीय विद्यालय भंडारा येथे दुरदर्शन संचाची व्यवस्था करण्यात आली. सर्व विद्यार्थी, शिक्षक तथा कर्मचाऱ्यांनी प्रक्षेपणाचा लाभ घेतला. कार्यक्रमसाठी मुख्याध्यापक रत्नीदीप मेश्राम, अनिल कापटे, जुबेर कुरैशी, हरिचंद्र चव्हाण, चेवनलाल नंदेश्वर, भुषण फसाटे, अल्का हटवार, वर्षा ठवकर, ज्योती मुळे, पराग शेंडे, राहुल बावनकुळे, रेखा गिऱ्हेपुंजे, श्रीराम शहारे, शेखर थोटे, गंगाधर मुळे, राजेश रघुते, सरोज भांडारकर यांनी सहकार्य केले.
वैनगंगा विद्यालयात, पवनी
स्थानिक वैनगंगा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात थेट प्रक्षेपण प्रोजेक्टर द्वारे प्रक्षेपित करण्यात आले. वैनगंगा शिक्षण संस्थेचे संचालक गणेश तर्वेकर, प्राचार्य मेंढे अनिल राऊ त, उपमुख्याध्यापिका चऊ त्रे, पर्यवेक्षिका भुते व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
आनंद शाळा, आंधळगाव
कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्यासाठी उच्चश्रेणी मुख्याध्यापक सदानंद कारेमोरे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विशेष सहकार्य केले. (लोकमत न्युज नेटवर्क)


 

Web Title: Two lakh students took advantage of

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.