भीषण अपघातात दोन ठार

By Admin | Updated: May 4, 2015 00:46 IST2015-05-04T00:46:31+5:302015-05-04T00:46:31+5:30

लाखांदूरहुन अर्जुनीकडे जात असताना पिंपळगाव (को.) गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी व ट्रॅव्हल्स यांच्यात ...

Two killed in a horrific accident | भीषण अपघातात दोन ठार

भीषण अपघातात दोन ठार

ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक : पिंपळगावजवळील घटना
लाखांदूर : लाखांदूरहुन अर्जुनीकडे जात असताना पिंपळगाव (को.) गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी व ट्रॅव्हल्स यांच्यात आमोरासमोर धडक झाली. यात दोन दुचाकीवरील दोन तरूणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. ही घटना काल २ मे रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
मिथुन सत्येवान बन्सोड (२५) व शैलेश तुळशीराम मेश्राम (२४) दोन्ही रा. पिंपळगाव/को. अशी मृतांची नावे आहेत. अर्जुनी (मोर) येथून कार्यक्रम आटोपून मिथुन व शैलेश हे दोघेही दुचाकी एम एच ३१ ऐयू १२९४ ने पिंपळगावकडे निघाले. लाखांदूरहून अर्जुनीकडे येणारी ट्रॅव्हल्स व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. यात दोघांनाही जबर मार लागल्याने त्यांच्या घटनास्थळी मृत्यू झाला. लाखांदूर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूरला आणले. ट्रॅव्हल्स पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस निरिक्षक प्रशांत कुलकर्णी तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

ट्रक उलटला
भंडारा : ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव व हयगयीने चालविले. कांद्री ते जाम या मार्गावर ट्रक उलटला. या अपघातात स्वत: चालक व वाहक जखमी झाले. याप्ररकणी आंधळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

दुचाकीच्या धडकेत दोन जखमी
भंडारा : लाखनी येथून साकोलीकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना विरूध्द दिशेने जाणाऱ्या वाहनचालकाने धडक दिली. यात दुचाकीवरील अनुराग कानेकर (२४) व प्राजक्ता मेश्राम (२४) हे दोेघे जखमी झाले. ही घटना लाखनी बसस्थानकासमोर घडली. लाखनी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

Web Title: Two killed in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.