कार-दुचाकी अपघातात दोन जखमी
By Admin | Updated: May 18, 2017 00:32 IST2017-05-18T00:32:35+5:302017-05-18T00:32:35+5:30
कारने मोटारसायकल व सायकलला धडक दिल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी येथे बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.

कार-दुचाकी अपघातात दोन जखमी
लाखनीतील घटना : जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : कारने मोटारसायकल व सायकलला धडक दिल्याने दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ही घटना लाखनी येथे बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
अमर दिघोरे (२१) रा. बोदरा, व प्रशांत गोमासे (२१) रा.चान्ना अशी जखमींची नावे आहेत.
येथील कुमार पेट्रोल पंपमधून पेट्रोल भरून कार साकोलीकडे जात असतांना दुचाकी आणि सायकलवरील विद्यार्थ्याला धडक दिली. मारुती भरधाव वेगाने असल्यामुळे सायकल आणि चालक गाडीच्या समोरच्या चाकाखाली आले. जखमींना वेळीच सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच मुरमाडी ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश खराबे, सचिन गुरुनानी यांनी रुग्णांची भेट घेतली. कार क्रमांक एमएच ३१ एएच ८४१६ असून चालक दिगंबर अंबादे (५५) रा. पोहरा यांच्याविरुध्द भादंवी ३३७, २७९ तसेच मोटार वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस ठाण्यात कार जमा करण्यात आली आहे. अधिक तपास टेर्भूणीकर करीत आहेत.