शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

मृत्यूच्या दाढेत दोन कुटुंबांचे वास्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:28 IST

प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला.

ठळक मुद्देवैनगंगा नदी काठावरील रेंगेपार येथील प्रकार : १३ पैकी ११ परिवारांना मिळाले घरकूल

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला घर असे शासनाकडून सांगण्यात येत आहे, पंरतु रेंगेपार येथील दोन कुटुंब वैनगंगेच्या अगदी काठावरील घरात वास्तव्याला आहेत. साक्षात मृत्यूच्या दाढेत राहत असून १३ पैकी ११ कुटुंबांना पंतप्रधान घरकूल योजनेचा लाभ मिळाला. केवळ दोन कुटुंबांना नियमात बसत नाही म्हणून वाऱ्यावर सोडण्यात आले. त्यापैकी एक विधवा महिला आहे. वैनगंगा नदीला सध्या पूर आला आहे. सदर पुरात घर वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मले घर देता का जी घर, असा आर्त टाहो महिलेने फोडला आहे.तुमसर तालुक्यात रेंगेपार (पांजरा) असे १३०० लोकवस्तीचे गाव आहे. अगदी नदी काठावर येथे १३ घरे आहेत. मागील २० वर्षापासून १३ कुटुंबे येथे वास्तव्याला होती. दिवसेंदिवस वैनगंगा नदीचे पात्र सोडून गावाच्या दिशेने झपाट्याने सरकत गेली. सध्या वैनगंगा नदीचे पात्र गावाजवळ भिडले आहे. १३ कुटुंबात १०२ सदस्यांचा समावेश होता. आंदोलने केल्यानंतर प्रशासनाने गावाशेजारी पंतप्रधान आवास योजनेतून ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली, पंरतु दोन कुटुंबांना नियमांचा आधार घेत घरकुल मंजूर केले नाही.या कुटुंबात विधवा महिला कलाबाई शेंडे व गुलाब कावळे यांचा समावेश आहे. कलाबाई यांच्या कुटुंबात दोन तर कावळे यांच्या कुटुंबात सहा सदस्यांचा समावेश आहे. दोन्ही कुटुंबांची घरे नदी काठावर असून नदी व घरांचे अंतर केवळ एका फुटापेक्षाही कमी आहे. घराचे मागील दार उघडले तर नदी समोर दिसते. भयाणस्थितीत दोन्ही कुटुंब वास्तव्य करीत आहेत. वैनगंगेचा प्रवाह भूखंड नदीकाठावर आदळतो. त्यामुळे खालील माती पाण्यासोबत वाहून जात आहे. त्यामुळे भूस्खलनाचा येथे मोठा धोका आहे.शासनाने येथे वरिष्ठ अधिकाºयांचे पथक पाठवून पाहणी केली होती. त्यानंतर ११ कुटुंबांना घरकुल मंजूर केली. धोकादायक घरे असा उल्लेख शासनदप्तरी नोंद आहे हे विशेष. राज्याच्या विधीमंडळात व संसदेत येथील घरांचा प्रश्न येथील लोकप्रतिनिधींनी मांडला होता. त्या अनुषंगाने कारवाई झाली, परंतु दोन कुटूंबाना कोणता नियम आडवा येत आहे. याचे उत्तर प्रशासनाकडून मिळाले नाही. घरकूल यादीतील प्रतिक्षा यादीतही दोन कुटुंबांची नावे नाहीत.कलाबाई यांनी आम्हाला जलसमाधीशिवाय पर्याय दिसत नाही, अशा वेदना बोलून दाखविल्या. घर देता का घर, अशी विनंती करुनही त्यांचा लाभ मिळत नाही अशी व्यथा डोळ्यात अश्रू आणून कलाबाईनी मांडली. 'शासन प्रत्येकाले घर देईन म्हणते, मले कव्हा भेटन' अशा शब्दात त्यांनी शासन व प्रशासनाकडे मागणी केली आहे. माझी मृत्यूशी दररोज भेट होते, परंतु सरकारशी भेट होत नाही, अशी खंत कलाबाईनी व्यक्त केली.रेंगेपार येथील १३ पैकी ११ कुटुंबांना घरकूल मंजूर करण्यात आले. दोन कुटूंबाना ते नाकारण्यात आले. नियमांचा आधार घेऊन त्यांना घरकूल मंजूर केले नाही. नदीपात्रात दोन्ही घरे समाविष्ट होण्याची दाट शक्यता आहे. अनर्थ घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. मानवी दृष्टीकोनातून वरिष्ठ लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी येथे विचार करावा.-हिरालाल नागपुरे, पंचायत समिती सदस्य, तुमसर