दोन वेगवेगळ्या नंबर प्लेटची चारचाकी पकडली

By Admin | Updated: January 23, 2015 01:13 IST2015-01-23T01:13:45+5:302015-01-23T01:13:45+5:30

पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैतपुर टी-पार्इंटवर पोलिसांची गाड्यांचे कागदपत्रे तपासणी मोहिम सुरू असताना लाखांदूरहून येणाऱ्या ...

Two different number plates took four chalkyaki | दोन वेगवेगळ्या नंबर प्लेटची चारचाकी पकडली

दोन वेगवेगळ्या नंबर प्लेटची चारचाकी पकडली

दिघोरी/मोठी : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैतपुर टी-पार्इंटवर पोलिसांची गाड्यांचे कागदपत्रे तपासणी मोहिम सुरू असताना लाखांदूरहून येणाऱ्या चारचाकी गाडीला पोलिसांनी हात दाखवून थांबण्यास सांगितले, मात्र सदर वाहनाने अजून गाडीचा वेग वाढवून पळ काढला. त्यामुळे या गाडीत काहीतरी असावे या संशयाने सदर पेलिसांनी पाठलाग केला असता वाहनचालकाने दिघोरीत ठाणेदार यादव यांचे निवासस्थानाजवळच गाडी उभी ठेवून शेताच्या दिशेने पळ काढला. अखेर पोलिसांनी त्याला बांध्यांवरून पकडून आणले असता परवाना नसल्यामुळे आपण पळालो, असे वाहनचालक प्रजासत्ताक बांते रा. लाखनी याने सांगितले.
सदर टाटासुमो वाहन पोलीस ठाणे दिघोरी येथे आणल्यानंतर समोरी बाजुचे नंबर प्लेटवर काहीतरी चिपकविले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येतात. पोलिसांनी नंबरप्लेटला घासले असता आतमध्ये पुन्हा दुसरी एक नंबर प्लेट दिसून आली. या नंबरप्लेटवर एचआर लिहलेले होते तर वरून चिपकविलेल्या व मागील बाजुच्या नंबर प्लेटवर एमएच नंबर आढळून आला त्यामुळे सदर गाडी चोरीची तर नसावी अशी शंका पोलिसांना आली. त्यांनी लगेच गाडीचे कागदपत्रे बघितले असता कागदपत्रांवर शरद तुलाराम कढव रा. टवेपार असे आढळून आले. तसेच प्रत्यक्षात गाडीवर असलेला चेचीस नंबर ४२१०५७ एएक्स झेड ९०११६ असून कागदपत्रांवर ४२१०५७ एएक्स झेड ९९११७ हा नंबर आढळून आला. त्यामुळे ठाणेदार यादव यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय खर्च कागदपत्रे अधिक तपासणीसाठी आरटीओ कार्यालय भंडारा येथे पाठविले आहे. आरटीओ कार्यालयातून मिळणाऱ्या तपशिलावर गाडी चोरीची आहे किंवा काय? याचे तथ्ये समोर येईल. (वार्ताहर)

Web Title: Two different number plates took four chalkyaki

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.