सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे जळाली
By Admin | Updated: April 23, 2017 00:38 IST2017-04-23T00:38:54+5:302017-04-23T00:38:54+5:30
चिखली येथील घटना : १० लाखांचे नुकसान

सिलिंडरच्या स्फोटात दोन घरे जळाली
चिखली येथील घटना : १० लाखांचे नुकसान
चिचाळ : चिखली येथे गुरुवारला दुपारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने दोन घरे बेचिराख झाली. यात घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.
पवनी तालुक्यातील चिखली (टोली) येथील पांडूरंग बारसागडे हे पत्नीसह लाखांदूर तालुक्यातील मांढळ येथे विटा तयार करण्यासाठी गेले होते. घरी मुलगा गावातील लग्न सोहळ्याला गेला होते. घरामागे अचानक आग लागल्याने घरातील सिलिंडरने स्फोट घेतला. त्यामुळे घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. घराशेजारील त्याचे भाऊ घनश्याम बारसागडे यांचे सुद्धा घर आगीच्या भक्ष्यस्थानी आले. यावेळी यांचे घरात पाळण्यात लहान बाळाला काढण्यात आले. मात्र कपडे, धान्य जळाले. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. घटनेची माहिती उपसरपंच मुकेश देशपांडे यांनी तहसीलदार, पोलिसांना दिली. घटनेचा पंचनामा करून दोन्ही घराचे ९ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे नोंदविले. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकवर्गणी गोळा करून ६ हजार ४०० रुपये दिले तर काहींनी कपडे, भांडे देऊन त्या दोन्ही कुटुंबाला आर्थिक मदत केली. घरकुल देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. (वार्ताहर)