समयसूचकतेमुळे फसला दोन मुलांच्या अपहरणाचा डाव

By Admin | Updated: December 9, 2015 00:38 IST2015-12-09T00:38:42+5:302015-12-09T00:38:42+5:30

आंगणवाडीसमोर उभा असलेल्या एका मुलाला अज्ञात अपहरणकर्त्यांनी दुचाकीवर बसवून फरार झाले.

Two children abducted due to time lapse | समयसूचकतेमुळे फसला दोन मुलांच्या अपहरणाचा डाव

समयसूचकतेमुळे फसला दोन मुलांच्या अपहरणाचा डाव

तुमसर : आंगणवाडीसमोर उभा असलेल्या एका मुलाला अज्ञात अपहरणकर्त्यांनी दुचाकीवर बसवून फरार झाले. रस्त्यात दुचाकी थांबवून पुन्हा दुसऱ्या एका मुलाला बोलावले. त्या मुलाने नकार दिला. त्यामुळे दुचाकीस्वाराने त्याचा पाठलाग केला. प्रसंगावधान ओळखून दुचाकीवर बसलेल्या मुलाने अपहरणकर्त्याच्या हाताचा चावा घेतला. हाताची पकड सैल होताच त्या मुलाने गावाकडे धूम ठोकली. ही घटना देव्हाडी येथे मंगळवारला सकाळी नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
तुमसर रोड (देव्हाडी) येथे आंबेडकर वॉर्डातील आंगणवाडीसमोर रोहीत मेश्राम (९) हा मुलगा उभा होता. इतक्यात एका दुचाकीवर दोन अज्ञात तरुण तिथे आले. त्यांच्या तोंडाला रूमाल बांधलेले होते. हाताच्या इशाऱ्याने त्यांनी रोहितला जवळ बोलाविले. रोहित त्यांच्याजवळ जाताच त्याला त्या तरुणांनी उचलून दुचाकीवर बसविले. त्यानंतर ते मांढळच्या दिशेने पसार झाले.
मांढळ गावानजिकच्या रस्त्यावर काही लहान मुले खेळत होते. त्या मुलांना पाहून अपहरणकर्त्यांनी दुचाकी पुन्हा थांबविली. दुचाकीच्या मागील युवकाने रोहितचे तोंड दाबून ठेवले होते. खेळणाऱ्या मुलाला अपहरणकर्त्यांनी जवळ बोलाविले. तो मुलगा दुचाकीजवळ न येता तिथूनच पळाला. त्यामुळे दुचाकीवरील एका तरुणाने त्या मुलाचा पाठलाग केला, परंतु तो सापडला नाही.
दरम्यान, रोहितने प्रसंगावधान ओळखून त्या तरुणांच्या हाताचा चावा घेतला. पकड सैल होताच रोहितने गावाच्या दिशेने धूम ठोकली. दोन्ही अपहरणकर्त्याने रोहितचा पाठलाग केला, परंतु गाव शिवारात लोकांना पाहून ते अपहरणकर्ते माघारी फिरले.
रोहित घरी पोहोचल्यावर या घटनेची माहिती आई-वडिलांना दिली. पोलीस मित्र आलमखान, राजकुमार लिल्हारे, संजय अटराये, यांनी दुचाकीने गावाच्या तीन दिशेकडे जावून आरोपींचा शोध घेतला. परंतु त्यांना आरोपींचा सुगावा लागला नाही. त्यानंतर ते देव्हाडीत पोहोचल्यावर मेश्राम कुटुंबीयांनी याप्रकरणी तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीवरुन तुमसर पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यां दोन तरुणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या घटनेचा तपास तुमसर पोलीस करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Two children abducted due to time lapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.