मानेगाव येथे दोन कारची धडक, चौघे गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST2021-03-01T04:41:19+5:302021-03-01T04:41:19+5:30

यातील जखमींमध्ये सेंट्रो चालक नंदकिशोर आत्माराम भंगाळे (५०) रा. मुरमाडी स्वीफ्ट कारमधील राजेश भाई पंडिया (५०) जीवराजजी शिवानी (४८) ...

Two cars hit Manegaon, four seriously | मानेगाव येथे दोन कारची धडक, चौघे गंभीर

मानेगाव येथे दोन कारची धडक, चौघे गंभीर

यातील जखमींमध्ये सेंट्रो चालक नंदकिशोर आत्माराम भंगाळे (५०) रा. मुरमाडी स्वीफ्ट कारमधील राजेश भाई पंडिया (५०) जीवराजजी शिवानी (४८) रा. सुरत आणि चालक प्रतीक सुरेंद्रकुमार पांडे (३०) रा. रायपूर यांचा समावेश आहे.

सेंट्रो कारमधून (एमएच ३१ एजी ३६८५) लाखनी बसस्थानकातून वृत्तपत्रांचे गठ्ठे घेऊन पालांदूरकडे जात असताना मानेगाव / सडक येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना साकोलीहून भरधाव वेगात आलेल्या कारने (सीजी ०४ एमपी २९९८)ने समोरासमोर धडक दिली. या अपघातात दोन्ही कारमधील चार जण जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, सेंट्रो कार धडक दिल्याबरोबर उलटली. घटनेची माहिती मिळताच लाखनी पोलिसांनी घटनास्थळी येऊन नागरिकांच्या मदतीने जखमींना पोलिसांचे वाहन व रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोपचार केल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. जखमी नंदकिशोर भंगाळे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कार चालक प्रतीक पांडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two cars hit Manegaon, four seriously