सोनी हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: April 1, 2015 00:34 IST2015-04-01T00:34:55+5:302015-04-01T00:34:55+5:30

मागीलवर्षी तुमसर येथे घडलेल्या बहुचर्चित सोनी हत्याकांडातील दोन आरोपींनी जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

Two of the accused in Soni murder case rejected the application | सोनी हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

सोनी हत्याकांडातील दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला

भंडारा : मागीलवर्षी तुमसर येथे घडलेल्या बहुचर्चित सोनी हत्याकांडातील दोन आरोपींनी जामिनासाठी केलेला अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
मोहम्मद अफरोज ऊर्फ साहिल शेख युसुफ शेख आणि त्याचा साथीदार शेख रफीक शेख रहमान रा. ताजबाग, नागपूर या दोन्ही आरोपींनी आपल्या वकिलांमार्फत भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी करताना तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश एन. बी. येनुरकर यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर आरोपींचा जामिन अर्ज नामंजूर केला.
आरोपींकडून अ‍ॅड.ए. आर. पांडे व अ‍ॅड.मिथुन कोदणकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
यावेळी त्यांनी या घटनेचा कुणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही. आरोपींना खून करताना कुणी पाहिलेले नाही. त्यांना केवळ संशयाच्या आधारावर अटक करण्यात आलेली आहे, असे सांगून त्यांना जामिन मिळावा असा युक्तीवाद केला.
त्यानंतर अतिरिक्त सरकारी वकील अ‍ॅड.राजकुमार वाडीभस्मे यांनी आपल्या युक्तीवादात आरोपींविरुद्ध ठोस पुरावे असल्याचा दावा केला. न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजु ऐकून घेतल्यानंतर आरोपींनी जामिनासाठी केलेली याचिका खारिज केली.
२६ फेब्रुवारी २०१४ रोजी तुमसर येथे सोनी हत्याकांड घडले होते. या सर्व आरोपींनी सुनियोजित कट रचून सराफा व्यापारी संजय रानपुरा (सोनी) त्यांची पत्नी पूनम आणि मुलगा ध्रूमिल या तिघांची गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर ८.३०० किलो सोन्याचे दागिणे ८४२ ग्रॅम चांदी आणि ३९ लाख रुपये रोख, कार, मोबाइल आदीसह सुमारे तीन कोटी रुपयांचा ऐवज घेऊन फरार झाले होते.
याप्रकरणात पोलिसांनी एकूण सात आरोपींना २४ तासाच्या आत अटक केली होती. या आरोपींकडून सर्व ऐवज जप्त करण्यात आला होता. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Two of the accused in Soni murder case rejected the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.