म्होरक्यासह दोन आरोपी गजाआड
By Admin | Updated: August 18, 2015 00:39 IST2015-08-18T00:39:12+5:302015-08-18T00:39:12+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून आरोपी पसार झाले.

म्होरक्यासह दोन आरोपी गजाआड
प्रकरण हल्ल्याचे : नागपुरात केली अटक, चार आरोपी फरार
तुमसर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांच्यावर प्राणघातक हल्ला करून आरोपी पसार झाले. यातील दोन हल्लेखोरांना शनिवारला अटक करण्यात आली होती. यातील आणखी दोघांना रविवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली आहे.
१५ आॅगस्टला निलेश शेंडे रा. काचेपुरा सीताबर्डी व अमोल महेंद्र मेश्राम रा. रमाईनगर कामठी याला अटक केली होती. रविवारी रात्री या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार संतोष डहाट (२५) रा. आंबेडकर वॉर्ड, तुमसर व त्याचा मित्र अमन नागदेवे (२२ रा. वैशालीनगर, नागपूूर याला नागपुरातून अटक करण्यात आली. चौघांनाही न्यायालयाने २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हल्ला प्रकरणातील पुन्हा चार आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींनी हल्ल्यात वापरलेले चारचाकी वाहन तुमसर पोलिसांनी जप्त केले आहे.
१२ आॅगस्टला नगरसेवक उके शासकीय आयटीआय समोरील घर बांधकामावर जाताना चारचाकीतून आलेल्या आठ हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले. त्यांच्यावर यांच्यावर देशी कट्ट्यातून दोन फैरी झाडल्या होत्या. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, असे समजून हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले होते.
पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवित यातील आरोपींना अटक केली. या हल्ल्यात सुपारी किलरची मदत घेण्यात आली. संतोष डहाट व अमन नागदेवे रविवारी रात्री वैशाली नगरात पान दुकानाजवळ उभे होते. डी.बी. पथकाने सापळा रचून दोघांना अटक केले. या हल्ल्यातील आणखी चार आरोपी फरार आहेत. नगरसेवक यांच्यावर आठ हल्लेखोरांनी हल्ला केला असा अंदाज आहे. चार आरोपीपैकी तीन आरोपी हे नागपूर व कामठीचे आहेत. आपशी वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. (तालुका / शहर प्रतिनिधी)