सुकामेव्याची उलाढाल कोटीवर!
By Admin | Updated: July 17, 2015 00:34 IST2015-07-17T00:34:42+5:302015-07-17T00:34:42+5:30
सुक्या मेव्याचे भाव गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्थिर आहेत. मोठी दरवाढ नसली तरी पावसाचा परिणाम ईदच्या बाजारावरही जाणवत आहे.

सुकामेव्याची उलाढाल कोटीवर!
ईदसाठी बाजारपेठ सजली : पावसाचा ईदच्या बाजारावर परिणाम
भंडारा : सुक्या मेव्याचे भाव गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्थिर आहेत. मोठी दरवाढ नसली तरी पावसाचा परिणाम ईदच्या बाजारावरही जाणवत आहे. त्यामुळे खरेदीत घट असल्याचे दिसून येत आहे.
दरवर्षी शेवटच्या टप्प्यात बाजारात होणारी गर्दी यावर्षी मात्र निम्म्यावरच आली आहे. ईद साजरी करणे महत्त्वाचे असल्याने कमी जास्त प्रमाणात ग्राहक सुक्या मेव्याची खरेदी करीत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पवित्र रमजान महिन्याचा समारोप शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यावर शनिवारी होण्याची शक्यता आहे. शेवटच्या मोठा रोजांपैकी बुधवारी पहिला रोजा होता.
आता भक्तीत तल्लिन झालेले भाविक खरेदीकडे वळले आहेत. त्यामुळे बुधवारी भंडारासह लाखनी, साकोली, तुमसर, पवनी, लाखांदूर बाजारात शिरखुम्यासार्ठी लागणाऱ्या ड्रायफुड्स खरेदीला ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. काजू, बदाम, पिस्ता, किसमीस आदी प्रमुख पदार्थांना सर्वाधिक मागणी आहे.
गतवर्षीच्या तुलनेत दरात वाढ झाली नसली तरी दुष्काळाचे सावट जाणवत आहे.
ईदच्या दिवशी शिरखुर्मा हा विशेष पदार्थ करण्यात येतो. आप्तस्वकीयांना गोड मधुर असलेल्या शिरखुम्यार्चे निमंत्रण दिले जाते. गरीब असो की, श्रीमंत सर्वांच्याच घरात ईदच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो. यासाठी लागणारे काजू, बदाम, किसमीस, चारोळी, टरबुज बी, खरबुज बी, आक्रोड, पिस्ता, खोबर, इलायची, बडीसोप, तूप, डालडा, शेवई आदी पदार्थ खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे.
शुक्रवारी चंद्रदर्शन होईल, या आपेक्षेने ईदची जय्यत तयारी करण्यात येत आहे. शिवाय, दुधाची बुकींगही केली जात आहे. बहुतांश ग्राहक सुका मेवा खरेदी करीत असताना ५0 ते १00 ग्राम प्रतिवस्तू या प्रमाणेच खरेदी करतात. त्यामुळे किरकोळ विक्री करणारी दुकाने सध्या ग्राहकांनी फुलली आहेत. दोन दिवस बाजारात मोठी गर्दी राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी दुकानांची सजावटही करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)