मुंडण करून दिली वाघांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:00 IST2019-01-13T22:00:22+5:302019-01-13T22:00:36+5:30
वर्षाच्या अखेर उमरेड पवनी कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यु झाला. अभयारण्याची शान राहिलेल्या ‘चार्जर व राही’ यांचा मृत्यु झाल्यामुळे आज दोन्ही वाघांना श्रद्धांजली वाहून पाच गाईडसनी मुंडण केले

मुंडण करून दिली वाघांना श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : वर्षाच्या अखेर उमरेड पवनी कºहांडला अभयारण्यातील दोन वाघांचा मृत्यु झाला. अभयारण्याची शान राहिलेल्या ‘चार्जर व राही’ यांचा मृत्यु झाल्यामुळे आज दोन्ही वाघांना श्रद्धांजली वाहून पाच गाईडसनी मुंडण केले
उमरेड पवनी करांडला अभयारण्यातील शान असलेल्या चार्जर व राही यांचा काही असामाजिक लोकांनी पवनी क्षेत्रातील चिचगाव बिटामध्ये विष प्रयोग केला. यामुळे ‘चार्जर व राही’ या दोन्ही वाघांचा मृत्यू झाला. पर्यटक व गाईड यांची आवडती राही मरण पावल्यामुळे पर्यटकात व गाइड मध्ये आजही नाराजी आहे.
रविवारी वनप्रेमी, गाईड पर्यटक यांच्यातर्फे क्रीड़ा संकुल पवनी येथे ‘राही व चार्जर’ यांना श्रद्धांजली वाहून मुंडण केले. वाघांच्या अस्थिंचे वैनगंगा नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसाद इंगले, छगन शहारे, दिनेश डहारे, पंकज तलमले, नामदेव बोडखे यांनी केले. कार्यक्रमाला नगर विकास आघाडी अध्यक्ष विलास काटेखाये, रामभाऊ भेंडारकर, पंकज देशमुख उपस्थित होते.
कार्यक्रम घेण्याचा उद्देश एवढाच की आसपासच्या परिसरातील गावकरी नागरिक यांच्यात वन्यप्राण्याबद्दल प्रेम निर्माण व्हावा, तसेच कोणीही प्राण्यांना मारू नये या करीता श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले होते.
- प्रसाद इंगळे, कार्यक़्रमाचे आयोजक
घरच्यांप्रमाणे वन्यप्राण्यांवर प्रेम करायला पाहिजे. ‘राही’ ‘चार्जर’ मरण पावल्यामुळे जंगलाचे फार मोठे नुकसान झाले आहे.
- छगन डहारे, गाईड पवनी गेट