तुमसर न.प. प्रशासनांविरुद्ध आमरण उपोषण

By Admin | Updated: July 20, 2016 00:27 IST2016-07-20T00:27:03+5:302016-07-20T00:27:03+5:30

तुमसर नगरपरिषद प्रशासनाच्या जालाला कंटाळून अनिल श्रावणकर या व्यवसायीकाने दुसऱ्यांदा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले.

Tumsar NP Amnesty Fasts Against Governments | तुमसर न.प. प्रशासनांविरुद्ध आमरण उपोषण

तुमसर न.प. प्रशासनांविरुद्ध आमरण उपोषण

आश्वासन हवेत विरले : वडिलोपार्जित दुकान नावावर करुन देण्याची मागणी
तुमसर : तुमसर नगरपरिषद प्रशासनाच्या जालाला कंटाळून अनिल श्रावणकर या व्यवसायीकाने दुसऱ्यांदा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले.
अनिल श्रावणकर यांचे वडील मूलचंद श्रावणकर यांनी त्यांचे नाव असलेले दुकान मुलगा अनिल यांच्या नावे कायदेशिररित्या करुन दिली. ही दुकान अनिल यांची नावे करण्यासाठी त्यांनी कागदपत्रासह नगरपरिषदेत जमा केले. अर्ज करुन २० महिने पूर्ण झाले.
शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता अनिल श्रावणकरयांनी २१ जुन रोजी नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले होते. २४ जूनला उपोषण मंडपास तत्कालीन पोलिस निरीक्षक जगदीश गायकवाड, तहसीलदार डी.टी. सोनवाने, नगरसेवक दिपक कठाणे, आरोग्य निरीक्षक जगदीश मेहर, बाजार व्यवस्थापक सुनिल लांजेवार यांनी भेट दिली. चर्चेनंतर आवश्यक शुल्क भरुन कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणाची सांगता झाली.
२५ दिवसानंतर नगरपरिषदेने कोणतीच कारवाई केली नाही. म्हणून पुन्हा अनिल श्रावणकर यांनी मंगळवारपासून पुन्हा नगरपरिषदेसमोर आमरण उपोषण सुरु केले. येथे श्रावणकर यांना नगरपरिषदेने वेळोवेळी उपोषणाची धमकी देऊन कार्यालयीन कामकाजात बाधा आणण्याचा प्रयत्न करीत आहात. या प्रकरणात वरिष्ठ कार्यालयाकडून किंवा न्यायालयाकडून दाद मागू शकता. उपोषणावर बसणे गैर आहे अशा आषयाचे पत्र दिले आहे.
तुमसर येथील प्रशासनाने अनिल श्रावणकर यांना आमरण उपोषणादरम्यान कोणत्याही अनुचित घटना घडून आल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल. या नोटीसचा उपयोग आपणाविरुध्द करावयाच्या कारवाईकरिता होवू शकतो. अशी नोटीस दिली.
या प्रकारामुळे उपोषणकर्ते अनिल श्रावणकर यांनी खंत प्रगट करुन कायदेशिर मार्गाने आमरण उपोषणाचा अधिकार नाही काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रकरणाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tumsar NP Amnesty Fasts Against Governments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.