तुमसर -मोहाडी क्षेत्राच्या विकासासाठी कटीबध्द

By Admin | Updated: November 6, 2014 01:02 IST2014-11-06T01:02:37+5:302014-11-06T01:02:37+5:30

मोहाडी - तुमसर क्षेत्राच्या सर्वांगिण विकास व जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे.

Tumsar-Katni for the development of Mhadi area | तुमसर -मोहाडी क्षेत्राच्या विकासासाठी कटीबध्द

तुमसर -मोहाडी क्षेत्राच्या विकासासाठी कटीबध्द

वरठी : मोहाडी - तुमसर क्षेत्राच्या सर्वांगिण विकास व जनतेच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक विकास संकल्पना शासन दरबारी मांडल्या. पण विधानभवनातून सकारात्मक यश आले नाही. आता जनतेनी थेट विधानसभेवर पाठविल्यामुळे मी अनुभवलेल्या व अभ्यास केलेल्या विकासात्मक संकल्पना थेट मांडता येतील व हक्काने मंजुर करवून आणता येतील. राजकारणात अनेक शंका - कुशंका असतात. पण मी त्यांना मानत नाही. क्षेत्रातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी राजकारण आडवे येणार नाही. या क्षेत्रातील समस्या सोडवण्यास मी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी दिले.
कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरच्या वतीने वरठी येथील शासकीय गोदामात व्यापारी व राशन दुकानदार यांच्याकरिता भौतिक सुविधा म्हणून थंड पाण्याचे यंत्र, शौचालय व बैठक व्यवस्था करण्यात आली. या सुविधाचे लोकार्पण आमदार चरण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, तहसीलदार कल्याण डहाट, जि.प. कृषी व पशुसंवर्धन सभापती संदीप टाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे, उपसभापती राजकुमार माटे, सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, राशन दुकानदार संघटना महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष ओमप्रकाश थानथराटे, रामदयाल पारधी, मनोहर कहालकर, हरीशंकर समरीत, युवराज आगासे, सुनिल गिऱ्हेपुंजे, दिवांजी पटले, विनोद बुराडे, राजु गायधने, विरेंद्र रंगारी, रवि येळणे, रामराव कारेमोरे, दादुमल राणे, सुभाष भोंगाडे उपस्थित होते.
नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांचा कृषि उत्पन्न बाजार समिती, स्वस्त धान्य डीलर संघ मोहाडी - तुमसर, ग्राम पंचायत कार्यालय वरठी, परमात्मा एक सेवक मंडळ वरठी, जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या वतीने सभापती भाऊराव तुमसरे, स्वस्त धान्य डीलर संघाच्या वतीने अरविंद कारेमोरे, ग्राम पंचायतच्या वतीने सरपंच संजय मिरासे, उपसरपंच मिलींद रामटेके, रविंद्र बोरकर, संगिता सुखानी, शशिकला चोपकर, मनिषा मडामे, नंदा सिरसाम, चांगदेव रघुते व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने श्रावण मते, विष्णुपंत चोपकर, रवि डेकाटे यांनी सत्कार केला.
संचालन व प्रास्ताविक स्वस्त धान्य डीलर्स संघाचे अध्यक्ष अरविंद कारेमोरे व आभार तथागत मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजकुमार गोसेवाडे, सहसचिव अनिल भोयर, मिनाक्षी घरडे, ग्यानीराम साखरवाडे, विरेंद्र देशमुख, परमानंद बन्सोड, बानु बोबडे, राधेशाम पडोळे, सिध्दार्थ रामटेके, भाजपचे सैनिक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष मिलींद धारगावे, सुरजभान चव्हान, धनलाल मेश्राम, घनशाम बोंदरे, गंगाधर पंचभाई, उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Tumsar-Katni for the development of Mhadi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.