मग्रारोहयोच्या कामात तुमसर तालुका अव्वल

By Admin | Updated: June 15, 2014 23:23 IST2014-06-15T23:23:02+5:302014-06-15T23:23:02+5:30

मग्रारोहयोच्या अकुशल तसेच कुशल कामावर जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करुन मजुरांच्या हाताला कामे देणारी तुमसर पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या आर्थिक वर्षात तुमसर

Tumar Taluka tops in the field of Magarroho | मग्रारोहयोच्या कामात तुमसर तालुका अव्वल

मग्रारोहयोच्या कामात तुमसर तालुका अव्वल

तुमसर : मग्रारोहयोच्या अकुशल तसेच कुशल कामावर जिल्ह्यात सर्वाधिक ५ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च करुन मजुरांच्या हाताला कामे देणारी तुमसर पंचायत समिती जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. या आर्थिक वर्षात तुमसर पंचायत समितीने २० कोटी रुपयांची कामे करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समिती तुमसरमार्फत ५० टक्के स्तरावर ग्रामपातळीवर मोठ्या प्रमाणात २१५ कामे सुरू आहेत. १२ हजार ८४२ मजूर या कामावर काम करीत आहेत. यात पांदण रस्त्याच्या ३९ कामांवर ७ हजार ५३२ मजूर, नाला सरळीकरणाऱ्या १५ कामांवर २ हजार १८६ मजूर, तलावातील गाळ काढण्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेतील शौचालय, सिंचन विहीर बांधकामावर ३७२ मजूर सध्या कार्यरत आहेत. आतापर्यंत अकुशल कामावर काम करणाऱ्या मजुरांना ४ कोटी ४७ लाख ५४ हजार रुपये तर कुशल कामाकरीता साहित्यावर १ कोटी १५ लाख ६ हजार असे एकूण ५ कोटी ६२ लाख ६१ हजार रुपये खर्च करण्यात आले.
तालुक्यात ३५ हजार ५३४ जॉबकार्डधारक असून आतापर्यंत २ लाख ९७ हजार १९८ मनुष्य दिवस मजुरांना काम पुरविण्यात आले. यापैकी १ लाख ८७ हजार २९७ मनुष्य दिवस महिला मजुरांच्या हाताला कामे देण्यात आल्याची माहिती पं.स. सभापती कलाम शेख व खंडविकास अधिकारी स्नेहा कुलथे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Tumar Taluka tops in the field of Magarroho

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.