तुकडोजी महाराजांचे विचार अंगिकारा
By Admin | Updated: January 17, 2015 22:54 IST2015-01-17T22:54:25+5:302015-01-17T22:54:25+5:30
तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास गावागावात आदर्श नांदेल. सामाजिक ऐकोपा नांदेल व त्यातून सर्वश्रेष्ठ भारत उभा राहिल. मात्र, त्यासाठी तुकडोजी महाराजांचे विचार

तुकडोजी महाराजांचे विचार अंगिकारा
शिवतीर्थावर भाविकांची गर्दी : अक्षयपाल महाराज यांचे प्रतिपादन
पालांदूर : तुकडोजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास गावागावात आदर्श नांदेल. सामाजिक ऐकोपा नांदेल व त्यातून सर्वश्रेष्ठ भारत उभा राहिल. मात्र, त्यासाठी तुकडोजी महाराजांचे विचार युवा पिढिने स्विकारने गरजेचे आहे, असे प्रतिपादन हभप सप्तखंजिरी वादक अक्षयपाल महाराज यांनी केले.
शिवतीर्थ चुलबंध नदीघाट खुनारी खराशी येथील मकरसंक्रांतीच्या यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनसमुदायाला संबोधित करीत होते.
दरवर्षीप्रमाणे शिवतीर्थ चुलबंद नदीघाट येथील मंदिरात भव्य यात्रा प्रवचन गोपालकाल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. यानिमित्ताने माजी आमदार सेवक वाघाये यांच्याकडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच हेमंत सेलोकर, जिल्हा बँकेचे संचालक विनायक बुरडे, उमराव आठोळे, प्रतिभा सेलोकर, उपसभापती संजय शिवणकर, वसंत शेळके, सुनिल लुटे, जितेंद्र कठाणे, भास्कर चेटूले, ताराचंद जगन्नाडे, शामराव बावनकुळे, महादेव निंबार्ते आदी उपस्थित होते.
मकरसंक्रांतीच्या निमित्ताने लाखनी तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या यात्रेला मान आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. महिला मंडळींची उपस्थिती उल्लेखनीय होती. अक्षयपाल महाराज यांच्या सप्तखंजिरी वादनाने भाविक मंत्रमुग्ध झाले.
सुरक्षेची जबाबदारी ठाणेदार सय्यद यांनी सांभाळली. संचालन सुधन्वा चेटूले तर आभार हेमंत सेलोकर यांनी केले. या कार्यक्रमाला पालांदूरसह परिसरातील गावातील नागरिक, महिला व युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यांनी आधात्मवर आधारित कार्यक्रमाचा लाभ घेतला. (वार्ताहर)