बाजारपेठेसाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 23:37 IST2018-02-03T23:37:15+5:302018-02-03T23:37:35+5:30
बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळून रोजगार प्राप्ती होण्यास मदत होते. तुमसरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले.

बाजारपेठेसाठी प्रयत्न करणार
आॅनलाईन लोकमत
तुमसर : बचत गटांच्या माध्यमातून महिलांमध्ये असलेल्या कला गुणांना वाव मिळून रोजगार प्राप्ती होण्यास मदत होते. तुमसरातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी, याकरिता प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले.
न.प. कस्तुरबा शाळेत आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित महिला बचत गटातर्फे आयोजित हस्तकला प्रदर्शनी व विक्री तथा रांगोळी पुष्पसजवाट स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष डॉ. सच्चिदानंद फुलेकर, न.प. माजी उपाध्यक्ष हुंदलदास रोचवानी, न.प. उपाध्यक्ष कंचन कोडवानी, नगरसेवक विद्या फुलेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, माजी नगराध्यक्ष गीता कोंडेवार, नगरसेवक भारती धार्मिक, तारा गभने, शिला डोये, अर्चना भुरे, भाग्यश्री निखाडे, स्मिता बोरकर, खुशलता गजभिये, कांचन पडोळे, खेमराज गभने आदी उपस्थित होते. शहरातील सर्वच बचत गटांच्या महिलांनी विविध तयार वस्तू प्रदर्शनीत मांडल्या होत्या. यात हस्तकलेच्या देखण्या वस्तंंूचा समावेश होता. विविध खाद्य पदार्थ महिला बचत गटांनी तयार केल्या होत्या. याप्रसंगी अतिथींनी आपले विचार व्यक्त केले. तुमसर नगरपरिषदेची स्थापना १८६७ मध्ये झाली होती. त्या अनुषंगाने मागील आठ दिवसांपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. कार्यक्रमाकरिता नगरपरिषद शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, न.प. कर्मचारी प्रयत्नशील आहेत. यावेळी सांस्कृतिक नृत्य न.प. कस्तुरबा शाळेतील विद्यार्थीनींनी सादर केले.